शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

गर्भाशय काढण्याचा ‘बाजार’ थांबणार; आता उच्चस्तरीय समिती करणार ‘ऑडिट’

By सोमनाथ खताळ | Updated: February 27, 2026 20:21 IST

ऊसतोडसह इतर महिलांच्या अनावश्यक शस्त्रक्रिया रोखण्यासाठी सरकारचा पुढाकार

बीड : बीड जिल्ह्यातील आणि राज्यातील ऊसतोड महिला कामगारांची गर्भपिशवी काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांचा गंभीर मुद्दा ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरला होता. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये आर्थिक फायद्यासाठी किंवा ऊसतोडणीच्या कामात व्यत्यय नको म्हणून गरज नसतानाही या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आले होते. याचीच गंभीर दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. यानुसार राज्यस्तरीय समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती ऑडिट करणार असल्याने गर्भपिशवी काढण्याचा बाजार थांबणार आहे.

राज्यस्तरीय समितीचे स्वरूप आणि अधिकारमहाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या राज्यस्तरीय समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या समितीत विधान परिषद सदस्या डॉ. मनीषा कायंदे, केजच्या आमदार नमिता मुंदडा, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि राज्यातील नामवंत स्त्रीरोग तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती प्रामुख्याने मागील तीन वर्षांत झालेल्या शस्त्रक्रियांचा तांत्रिक अभ्यास करणार आहे. तसेच ज्या महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन आणि मुलाखती घेऊन माहितीची पडताळणी करणार आहे.

जिल्हास्तरीय समित्यांवर मोठी जबाबदारीकेवळ राज्यस्तरावरच नव्हे, तर आता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती कार्यरत असेल. या समितीत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ‘फोग्सी’ या नामांकित वैद्यकीय संघटनेचे प्रतिनिधी असतील. ही समिती स्थानिक पातळीवरील खासगी रुग्णालयांनी केलेल्या शस्त्रक्रियांचे ‘ऑडिट’ करेल. जर एखादी शस्त्रक्रिया अनावश्यक आढळली, तर संबंधित रुग्णालयावर कठोर कारवाईची शिफारस ही समिती करेल.

अनावश्यक शस्त्रक्रियेच्या ‘दुकानदारी’ला बसणार चापअनेकदा ऊसतोडणीच्या काळात रजा नको किंवा शारीरिक त्रास नको म्हणून ऊसतोड महिलांना गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अनेक ठिकाणी वैद्यकीय निकष पाळले जात नाहीत. ‘लोकमत’ने हा सामाजिक आणि आरोग्याचा प्रश्न वारंवार मांडल्यामुळे आता शासनाने यावर कडक निर्बंध घातले आहेत. वर्षातून किमान दोनदा या समित्यांच्या बैठका होऊन त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. यामुळे राज्यातील ऊसतोड महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, आरोग्याशी खेळणाऱ्या प्रवृत्तींना आता चाप बसणार आहे.

‘लाेकमत’च्या वृत्ताची गंभीर दखल‘लाेकमत’ने २ जून २०२५ रोजी ‘ऊसताेडीला जाण्यापूर्वी ८४३ महिलांची काढली गर्भपिशवी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर १० जून २०२५ रोजी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक झाली. त्यानंतर आता २५ फेब्रुवारी रोजी त्याच बैठकीतील निर्णयांचा संदर्भ देत शासन निर्णय काढला आहे. ‘लाेकमत’ने सुरुवातीपासूनच या संवेदनशील विषयावर मांडणी करून शासनाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला होता. याची अंमलबजावणी आता राज्यभर होणार आहे.

समितीवर काय जबाबदारी असेल?रेकॉर्ड तपासणी : मागील ३ वर्षांतील खासगी रुग्णालयांमधील सर्व शस्त्रक्रियांचे रेकॉर्ड तपासणे.प्रत्यक्ष पडताळणी : शस्त्रक्रिया झालेल्या महिलांच्या मुलाखती घेऊन वस्तुस्थिती जाणून घेणे.तांत्रिक अभ्यास : शस्त्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या अनिवार्य होती की नाही, याचा तांत्रिक अभ्यास करणे.प्रतिबंधात्मक उपाय : भविष्यात अशा अनावश्यक शस्त्रक्रिया रोखण्यासाठी शासनाला शिफारशी करणे.

बैठकांचे नियोजन : राज्य आणि जिल्हा समितीच्या वर्षातून किमान दोन बैठका अनिवार्य.

अशी आहे आकडेवारीवर्ष - खासगी रुग्णालये - शासकीय रुग्णालये२०१९ - २२ - ००

२०२० - ४ - ००२०२१ - ३० - ००

२०२२ - ४९ - ००२०२३ - ८३ - ०६

२०२४ - ५५ - ००मार्च २०२५ पर्यंत - १७ - ०१

एकूण - २६० - ०७

English
हिंदी सारांश
Web Title : Hysterectomy 'Market' to End; High-Level Committee to Audit

Web Summary : Maharashtra forms committees to audit hysterectomies among sugarcane workers, following reports of unnecessary surgeries. The state and district committees will investigate past procedures and prevent future exploitation, ensuring women's health.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याSugar factoryसाखर कारखाने