पोलिसांकडून दंडात्मक कारवाईवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:33 IST2021-05-23T04:33:59+5:302021-05-23T04:33:59+5:30
बीड : सध्या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असून, विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व मास्क न वापरणाऱ्या २ हजार ३८६ जणांवर शुक्रवारी ...

पोलिसांकडून दंडात्मक कारवाईवर भर
बीड : सध्या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असून, विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व मास्क न वापरणाऱ्या २ हजार ३८६ जणांवर शुक्रवारी (दि.२१) कारवाई करत ५ लाख २८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती बीड पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
सध्या २५ मेपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असून, नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी दंडात्मक कारवाईवर भर दिल्याचे चित्र आहे. २१ मे रोजी जिल्ह्यात २ हजार ३८६ जणांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी तब्ब्ल ५ लाख २८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान १५ मेपासून जिल्ह्यात दंडात्मक कारवाई आणि गुन्हा दाखल करण्यावर भर दिल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी अत्यावश्यक काम असतानादेखील पोलिसांकडून अडवणूक होत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वांची तपासणी करावी, विनाकारण बाहेर फिरत असेल तर कारवाई करावी मात्र, विनाकारण अडवणूक करू नये, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.