शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

आयकर विभागात अपहार; कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:33 PM

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : आयकर अधिकाऱ्यांच्या लॉगीन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून तब्बल साडेतीन लाख रुपयांचा अपहार केल्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आयकर अधिकाऱ्यांच्या लॉगीन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून तब्बल साडेतीन लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटी कर्मचाºयावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सय्यद साजेद सय्यद महेबूब (रा. राजूनगर, धानोरा रोड, बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या कंत्राटी कर्मचाºयाचे नाव आहे. साजेद हा २००८ पासून कंत्राटी कर्मचारी आयकर कार्यालयात कार्यरत होता.त्याच्याकडे डाटा एंट्रीचे काम सोपविण्यात आले होते. कार्यालयीन कामाचा भाग म्हणून आयकर अधिकाऱ्यांचा लॉगईन आयडी व पासवर्ड त्याच्याकडे होता. त्या आधारे त्याने २०१५ ते २०१८ या दरम्यान करदात्यांचा आयकर परतावा तसेच टीडीएसचा अधिकचा क्लेम देऊन त्याद्वारे मिळणारा रिफंड मंजूर करुन घेत तो एका पतसंस्थेतील खात्यात जमा करुन उचलला. अशा प्रकारे त्याने प्रथमदर्शनी ३ लाख ५७ हजार १० रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे.१८ डिसेंबर २०१८ रोजी नंदकिशोर झरीकर (रा. क्रांतीनगर) या करदात्याने त्यांच्या नावे परस्पर ई- फाईल बनवून कर परताव्याचे ८४ हजार ४१० रुपये उचलल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आयकर अधिकारी धीरेंद्र रंगदळ यांनी पडताळणी केली तेव्हा गोवर्धन गिते ९७ हजार ४९०, विजूबाई मोराळे ९३ हजार ३२० व प्रभाकर उंबरे यांच्या नावे ८१ हजार ७९० रुपये कर परतावा परस्पर उचलल्याची बाब समोर आली. त्यानंतर रंगदळ यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन फसवणूक व आयकर कायदा कलम १४३ (१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक महेश टाक करत आहेत.

टॅग्स :BeedबीडIncome Taxइन्कम टॅक्सfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी