अंगार, भंगार काय आहे, मला आवडत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST2021-08-17T04:39:17+5:302021-08-17T04:39:17+5:30
परळी : तुमच्या बालिशपणाचा मला त्रास होतो. मूर्ख आहात का? हा काही दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का, ही पद्धत ...

अंगार, भंगार काय आहे, मला आवडत नाही
परळी : तुमच्या बालिशपणाचा मला त्रास होतो. मूर्ख आहात का? हा काही दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का, ही पद्धत आहे का वागायची, मुंडे साहेब अमर रहे.....या घोषणा मी रोखू शकत नाही; पण अंगार-भंगार काय आहे, हे मला आवडत नाही. आपण घरंदाज आहोत. जेवढ्या उंचीची मी, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची, नाही तर मला भेटायला यायचं नाही अशा स्पष्ट शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली भाजपची मराठवाड्यातील जन आशीर्वाद यात्रा परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन सोमवारी सुरू झाली. या यात्रेस भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला. यावेळी मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी पंकजाताई ‘अंगार’ है, बाकी सब ‘भंगार’ है, अशी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या या घोषणाबाजीवर पंकजा मुंडे संतापल्या होत्या. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे या उपस्थित होत्या. सकाळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या निवासस्थानी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचे स्वागत केले. येथेही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी केली होती. येथून श्री वैद्यनाथ मंदिर पायरीचे राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत दर्शन घेतले. त्यानंतर गोपीनाथ गडावर पोहोचले.
गोपीनाथ गड प्रेरणा देणारा
गोपीनाथगड येथे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमचे नेते माननीय मुंडे साहेब यांच्या स्मरणार्थ माननीय पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गड बांधलेला आहे. गोपीनाथ गड बांधतानाच त्यांनी ‘हा गड प्रेरणेचा, हा गड ऊर्जेचा’ असे ब्रीद म्हटले आहे. म्हणून येथे येणारा प्रत्येक कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल तो प्रेरणा घेऊन जातो. भाजपच्या माध्यमातून जन आशीर्वाद यात्रेला येथून सुरुवात करीत असल्याचे ते म्हणाले. आमच्या नेत्या पंकजा मुंडे आहेत. त्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांच्या हस्ते यात्रेस सुरुवात करीत आहोत. आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार इथे दर्शनाला आलो, सोबत खा. प्रीतम मुंडे याही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
160821\img-20210816-wa0225_14.jpg~160821\img-20210816-wa0343_14.jpg