शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:31 AM

बीड : गेवराई तालुक्यातील मीरगांवचा बाजार करून गेवराईकडे परतणाऱ्या एका सोने व्यापाऱ्याला दैठण फाट्याजवळ अडवून त्याच्याकडील १४ तोळे ...

बीड : गेवराई तालुक्यातील मीरगांवचा बाजार करून गेवराईकडे परतणाऱ्या एका सोने व्यापाऱ्याला दैठण फाट्याजवळ अडवून त्याच्याकडील १४ तोळे सोने व ५ किलो चांदीचे दागिने असा ९ लाख ६६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरी चोरून नेला होता. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. प्रकरणातील तिघांना ताब्यात घेण्यात यश आले असून, चार फरारींचा शोध सुरू आहे. दरम्यान, चोरीचे सोने विकत घेणाऱ्या गेवराईतील सोनारालाही अटक केली आहे.

गेवराई येथील सराफ चंद्रकांत उदावंत हे २७ फेब्रुवारी रोजी मीरगाव येथील आठवडी बाजाराला गेले होते. बाजार उरकून ते गेवराईकडे परतत असताना, दैठण फाट्याजवळ दुपारी १ वाजता आरोपी नितीन दत्तात्रय जाधव (रा.गेवराई), राहुल कुंडलिक बुधनर (रा.खामगाव), दीपक भुसारे (रा. शिर्डी) यांनी त्यांच्या इतर चौघांच्या साथीने चंद्रकांत उदावंत यांना थांबवून त्यांच्याकडील १४ तोळे सोने व जवळपास ५ किलो चांदीचे दागिने असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेतली आणि त्या ठिकाणावरून पळ काढला. या प्रकरणी उदावंत यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोनि भारत राऊत यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, गेवराईत छापा टाकून आरोपी नितीन जाधव, राहुल बुधनर आणि दीपक भुसारे यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली, तसेच सोने व चांदी ही गेवराई येथील संदीप जवकर या सोन्याच्या व्यापाऱ्यास विकल्याचेही सांगितले. त्यानंतर, जवकर यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, उपाधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. भारत राऊत, सपोनि दुल्लत, पोह.तुळशीराम जगताप, विकास वाघमारे, बालाजी दराडे, मुन्ना वाघ, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, विक्की सुरवसे, चालक हतुल हराळे आणि जायभाये यांनी केली.

आणखी एका गुन्ह्याची दिली कबुली

या प्रकरणात अटक केलेला आरोपी नितीन जाधव आणि राहुल बुधनर यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मार्फत ऑगस्ट, २०२० मध्ये गेवराईजवळील नागझरी फाटा येथील एका पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला धमकावून व मारहाण करून, त्याच्याकडील ३८ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले होते. या गुन्ह्याचीही कबुली यावेळी आरोपींनी दिली. या चोरट्यांनी या अगोदरही अनेक गुन्हे केले असून, ते उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.