माजलगावात वीज कर्मचाऱ्यास मारहाण; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:35 IST2019-12-08T00:35:30+5:302019-12-08T00:35:59+5:30
लोक अदालतची नोटीस बजावण्यास गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांस ‘तू माझा फोटो का काढतोस’ या कारणावरून कर्मचारी प्रल्हाद मनोहर जाधव यांना मारहाण करून शिवीगाळ केल्याच्या घटनेवरून सईद खिजर निजामोद्दीन यास पोलिसांनी अटक केली आहे.

माजलगावात वीज कर्मचाऱ्यास मारहाण; एकास अटक
माजलगाव : लोक अदालतची नोटीस बजावण्यास गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांस ‘तू माझा फोटो का काढतोस’ या कारणावरून कर्मचारी प्रल्हाद मनोहर जाधव यांना मारहाण करून शिवीगाळ केल्याच्या घटनेवरून सईद खिजर निजामोद्दीन यास पोलिसांनी अटक केली आहे.
शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महावितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रल्हाद जाधव हे जिल्हा लोक अदालतची नोटीस बाजावण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे फोटो काढताना माझे फोटो का काढतात असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली व नोटीस चुरगाळा करून फेकून देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार जाधव यांनी दिल्याने सईद खिजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जयराम भटकर तपास करत आहेत.