धारूर : तालुक्यातील मैंदवाडी येथे शुक्रवारी शेतात वीज पडल्यामुळे जनावरे सांभाळणारी महिला ठार झाली आहे. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.राधाबाई मुंकूदा मैंद (वय ५५ वर्ष) असे त्या महिलेचे नाव आहे. धारूर तालुक्यात शुक्रवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह चांगला पाऊस झाला आहे. यावेळी पावसात मैंदवाडी शिवारातील एका शेतात अचानक वीज पडल्यामुळे जनावरे सांभाळणाऱ्या राधाबाई मैंद या ठार झाल्या. ही घटना शेताच्या शेजारील उतरेश्वर मैंद यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ धाव घेत गावात ही घटना सर्वांना कळवली गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत धारूर येथील रुग्णालयात नेले. मात्र, त्याठिकाणी त्यांना मृत घोषीत करण्यात आले. येथे शवविच्छदन करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर मैंदवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वीज पडून मैंदवाडी येथे महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:13 IST