गरम पाणी अंगावर पडल्याने वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:17 IST2019-05-20T00:16:32+5:302019-05-20T00:17:05+5:30
लीवरील गरम पाण्याचे पातेले उचलून खाली ठेवत असताना पाणी अंगावर पडून गंभीर भाजलेल्या सरूबाई नंदू आचार्य (वय ७५) या वृद्धेचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गरम पाणी अंगावर पडल्याने वृद्धेचा मृत्यू
अंबाजोगाई : चुलीवरील गरम पाण्याचे पातेले उचलून खाली ठेवत असताना पाणी अंगावर पडून गंभीर भाजलेल्या सरूबाई नंदू आचार्य (वय ७५) या वृद्धेचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सरूबाई आचार्य या मुळच्या अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील रहिवासी होत्या. त्यांची मुलगी अर्चना राजेंद्र मोरे अंबाजोगाईतील वडारवाडा भागात राहते. सध्या सरूबाई मुलीकडे राहण्यासाठी आल्या होत्या. गुरुवारी सकाळी ८ वाजता चुलीवरील गरम पाण्याचे पातेले उचलून खाली ठेवत असताना पातेले हातातून निसटले आणि उकळते पाणी सरूबार्इंच्या अंगावर पडले. यात त्या गंभीर भाजल्या. त्यांच्या मुलीने तातडीने त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, शनिवारी सकाळी. ९.१० वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पो.ह. अभंग यांनी पंचनामा केल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.