शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात मराठवाड्यातील आठ बसस्थानके उत्कृष्ट

By अनिल भंडारी | Updated: February 12, 2024 19:11 IST

प्रवाशांना दररोज स्वच्छ, सुंदर स्थानकातून व बसमधून प्रवास करता यावा या हेतूने गत नऊ महिन्यांपासून हे अभियान सुरू होते.

बीड : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात ११७ पैकी आठ बसस्थानके उत्कृष्ट ठरली आहेत. मे ते डिसेंबर २०२३ दरम्यान झालेल्या मूल्यांकनातून या बसस्थानकांनी बाजी मारल्याचे दिसून आले.

प्रवाशांना दररोज स्वच्छ, सुंदर स्थानकातून व बसमधून प्रवास करता यावा या हेतूने गत नऊ महिन्यांपासून हे अभियान सुरू होते. या अंतर्गत तीन सर्वेक्षण करण्यात आली. मे ते डिसेंबर २०२३ या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणातून विविध समित्यांमार्फत बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानुसार छ. संभाजीनगर प्रादेशिक विभागात वर्ग अ मध्ये असलेल्या २५ बसस्थानकांमधून रापमच्या बीड विभागातून अंबाजोगाई बसस्थानक अव्वल ठरले, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील वैजापूर तसेच लातूर विभागातील निलंगा बसस्थानकांना द्वितीय क्रमांक मिळाला. तृतीय क्रमांक एकाही स्थानकाला मिळू शकला नाही.

वर्ग ब मध्ये ३३ बसस्थानकांचा समावेश होता. यात जालना विभागातील अंबड स्थानकाने प्रथम, परभणी विभागातील हिंगोलीने द्वितीय, तर लातूर विभागातील लातूर बसस्थानकाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. वर्ग क मध्ये ५९ बसस्थानकांचा समावेश होता. यातील नांदेड विभागातील भोकर स्थानकाने प्रथम, तर धर्माबाद स्थानकाने द्वितीय क्रमांक मिळविला. या गटात तृतीय क्रमांक एकाही स्थानकाला मिळाला नाही.

बसस्थानकांना असे मिळाले गुणवर्ग अ १) अंबाजोगाई ७४- २) वैजापूर ७१, निलंगा ७१ - ३) निरंकवर्ग ब १) अंबड ८० - २) हिंगोली- ७२- ३) लातूर ७१वर्ग क १) भोकर ७२- २) धर्माबाद ७०- ३) निरंक

११७ बसस्थानकांची तपासणीस्वच्छतेबाबत बसस्थानक, परिसर आणि स्वच्छतागृहांसाठी ५० गुण होते. बस स्वच्छता आणि प्रवासी अभियानासाठी २५ व इतर असे एकूण १०० गुण होते. ५० पेक्षा कमी गुणांसाठी वाईट, ५० ते ७० गुणांसाठी मध्यम अणि ७० पेक्षा जास्त गुणांसाठी चांगले असे मूल्यमापनाचे वर्गीकरण करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर विभागातील ११७ बसस्थानकांची तपासणी या अभियानातून करण्यात आली.

टॅग्स :state transportएसटीBeedबीड