विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी खासगी शाळांचे प्रयत्न - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:53+5:302021-08-12T04:37:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता शाळा सुरू होतील, अशी ...

विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी खासगी शाळांचे प्रयत्न - A
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता शाळा सुरू होतील, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी संस्था चालकांनी शाळांना रंगरंगोटी करीत भिंती बोलक्या केल्या आहेत. यामुळे पालकदेखील या शाळेकडे आकर्षित होत आहेत.
कोरोना लाॅकडाऊनमुळे गेल्या वर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पास करण्यात आले. त्यानंतर कोरोना रुग्ण कमी होत नसल्याने शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण घेतले. ऑनलाइन शिक्षण दिल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील, अशी आशा होती. परंतु कोरोनाची दुसरी लाट आल्याने शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्याही वर्षी परीक्षा न घेता पास केले.
मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने शाळांची स्वच्छता झाली नव्हती. शाळा सुरू नसल्याने शाळेच्या संपूर्ण आवारात तसे सुनेसुने वाटत होते. यामुळे ही शाळा आहे की नाही, असाच प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होता. माजलगाव तालुक्यातील लवूळ येथील गजानन विद्यालय या ठिकाणी दहावीपर्यंत शाळा असून मागासवर्गीय वसतिगृहदेखील या ठिकाणी आहे. शासनाने शाळा हळूहळू सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी येथील संस्थाचालकांनी शाळेला रंगरंगोटी सुरू केली आहे. त्याचबरोबर संपूर्ण भिंतीवर बोलकी अशी चित्रे काढून या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणी, राष्ट्रगीत, कविता लिहिण्यात येत आहेत. यामुळे संपूर्ण शाळेचा आवार सुशोभित दिसत आहे.
-----
विद्यार्थी शाळेत आल्यानंतर आकर्षित व्हावा हा आमचा उद्देश आहे. यामुळे आम्ही शाळेला रंगरंगोटी केली आहे.
- राजूबाई वैजनाथ शिंदे,
अध्यक्षा, गजानन शिक्षण प्रसारक मंडळ, लवुळ
--------
कोरोनामुळे मागील दीड वर्षात विद्यार्थ्यांमध्ये मरगळ निर्माण झाली आहे. यामुळे शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना चालना मिळून त्याच्या ज्ञानात भर पडावी यासाठी आम्ही शाळेचे सुशोभीकरण हाती घेतले आहे. शाळेच्या भिंतीदेखील बोलक्या केल्या आहेत.
- मोहन डोईफोडे, सहशिक्षक, गजानन विद्यालय
090821\4351img_20210809_131514_14.jpg~090821\4351img_20210809_131244_14.jpg
शाळा सुरू होणार असल्याने शाळांंना रंगरंगोटी केली जात आहे.