शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
4
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
5
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
6
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
7
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
8
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
9
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
10
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
11
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
12
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
13
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
14
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
15
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
16
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
17
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
18
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
19
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
20
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश फिसच्या नावे पालकांची लुट; आमदारांनीच केले स्टिंग ऑपरेशन, शिक्षक ताब्यात,रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 18:46 IST

माजलगावात सिद्धेश्वर विद्यालयाचे कर्मचारी प्रवेश फीसच्या नावाखाली पालकांची लूट करताना पकडले

- पुरूषोत्तम करवा माजलगाव ( बीड) : शहरात विद्यार्थ्यांची अडवणूक करून फिसच्या नावाखाली लूट करत असल्याची नेहमीच ओरड असणाऱ्या सिद्धेश्वर विद्यालयाचे तीन कर्मचारी पालकांकडून प्रवेशाच्या नावावर लुट करत असल्याचा प्रकार उघड झाला. येथील वैष्णवी मंगल कार्यालय येथे सुरू असलेला शिक्षणाचा बाजार स्वतः आमदार प्रकाश सोळंके यांनी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी,पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांना सोबत घेऊन स्टिंग ऑपरेशन द्वारे उघडकीस आणला. यावेळी प्रवेश फिसच्या नावाखाली घेतलेली १ लाख ७६ हजार रोकड जप्त करण्यात आली. नामांकित शाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कृत्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

येथील सिध्देश्वर शिक्षण संकुलात स्थानिक कार्यकारणीकडून नेहमीच प्रवेश फिसच्या नावाखाली पालकांची लूट करण्यात येत असल्याची ओरड होत असते. प्रहार संघटनेचे गोपाल पैजने यांनी याबाबत शिक्षण विभागाकडे अनेक वेळा तक्रार करून देखील याची दखल घेतली नव्हती. दरम्यान, आज मंगळवार रोजी येथील वैष्णवी मंगल कार्यालयात पालकांना बोलावून विविध वर्गाच्या सेमी इंग्लिशच्या प्रवेशासाठी पालकांकडून 20-25 हजार रुपये फिस घेऊन प्रवेश देण्यात येत होते. या प्रकाराची तक्रार आ. प्रकाश सोळंके यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर आ. सोळंके यांनी  शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे , गटशिक्षणाधिकारी एल.बी.बेडसकर यांना सोबत घेऊन वैष्णवी मंगल कार्यालय येथे स्टिंग ऑपरेशन केले.

या ठिकाणी पालकांकडून कर्मचाऱ्यांना मार्फत रोख रक्कम घेण्याची प्रक्रिया सुरू होती. या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून पोलिसांनी १ लाख ७६ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. दरम्यान, या प्रकाराने संस्थेत गेल्या कित्येक वर्षापासून चाललेला अनागोंदी कारभार समोर आला आहे. यावेळी शिक्षक ढगे, आदमने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दोन शिक्षक फरार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, चार वाजेपर्यंत पालकांची जवाब नोंदविण्याचे काम सुरू होते. या जबाबावरून संबंधित दोन्ही शिक्षकांना माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आणून गटशिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडEducationशिक्षणCrime Newsगुन्हेगारी