शौचालयाच्या हौदात बुडून चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 23:44 IST2019-05-08T23:43:34+5:302019-05-08T23:44:39+5:30

घरासमोर खेळत असताना शौचालयासाठी बांधलेल्या पाण्याच्या हौदात पडून बुडाल्याने एका दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.

Dying of toilets, death of chimukali | शौचालयाच्या हौदात बुडून चिमुकलीचा मृत्यू

शौचालयाच्या हौदात बुडून चिमुकलीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : घरासमोर खेळत असताना शौचालयासाठी बांधलेल्या पाण्याच्या हौदात पडून बुडाल्याने एका दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी शिरुर कासार तालुक्यातील नांदेवली गावात घडली.
अनुष्का कानिफनाथ थिटे असे बुडून मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. अनुष्का ही घरासमोर खेळत होती. घराच्या बाजुलाच शौचालयासाठी हौद बांधण्यात आलेला असून त्यात पाणी होते. खेळता-खेळता ती चिमुकली अचानक हौदात पडली आणि पाण्यात बुडाली. तिच्या पालकांना हा प्रकार लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले. या प्रकरणी कानिफनाथ थिटे यांच्या खबरेवरुन रुग्णालय चौकीत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Dying of toilets, death of chimukali