हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी करतात दुधाचा खवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:43 IST2018-07-18T00:43:13+5:302018-07-18T00:43:32+5:30

हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी करतात दुधाचा खवा
दीपक नाईकवाडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने विण्याऐवजी दुधाचा खवा करु न शेकडो क्विंटल खव्याची पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबादच्या बाजारपेठेत विक्री करण्यात येते. दुधापेक्षा खव्याचा दर शेतक-यांना परवडत असल्याने दूध संकलन केंद्रांकडे पाठ फिरवत दूध उत्पादक शेतकरी खवा विक्रीवर भर देत आहेत.
शेतक-यांच्या दुधाला मागणी मोठ्या प्रमाणात असली तरीही दुधाला शेतकरी मागतील तो भाव ग्राहक देत नाहीत. उलट दुधात पाण्याचे प्रमाण असल्याचे सांगत दूध उत्पादक शेतकºयांचा भाव पाडला जातो. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी दुधापासून खवा करण्याच्या व्यवसायाकडे आकर्षित झाले आहेत. तालुक्यात शेकडो खवा भट्टी आहेत. तेथे सकाळी दूध घातल्यानंतर त्याचा खवा करु न बाजारात विकला जातो. दररोजच्या बाजारभावा प्रमाणे दुधाचा दर शेतकºयांना कोणत्याही प्रकारचे झंझट न करता मिळतो. तालुक्यातील शेकडो खवा भट्टीत उत्पादन होणारा शेकडो क्विंटल खवा पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणच्या बाजार पेठेत जातो.
दूध उत्पादक शेतकºयांना खवा भट्टी चालक गायी, म्हशीच्या खरेदीसाठी आगाऊ उचलही देतात व त्याची परतफेड त्या जनावरांच्या दुधापासून उत्पन्न होणा-या खव्याच्या रक्कमेतून करून घेत असल्याने तालुक्यातील शेतक-यांनी दुधाची विक्री करण्याऐवजी त्याचा खवा बनविण्याकडेच भर दिला जात
असल्याचे तालुक्यात दिसत आहे.
हॉटेल चालकांकडून लूट
शहरातील हॉटेलवर दूध देणाºया शेतक-यांची आठवड्यातून एक दिवस तरी ‘खवा कमी भरला’ असे कारण देत दुधाची रक्कम हॉटेल चालक देत नाहीत. परिणामी शेतक-यांची आर्थिक लूट होते. त्यामुळे दुधाचा खवा करणेच परवडते असे दूध उत्पादक शेतक-यांनी बोलताना सांगितले.