वीटभट्ट्यांमुळे विद्रुपा नदीपात्र झाले अरुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST2021-05-24T04:32:26+5:302021-05-24T04:32:26+5:30

सखाराम शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : शहरातून वाहणाऱ्या विद्रुपा नदीला गेल्या अनेक वर्षांपासून नालीचे स्वरूप आले आहे. याच ...

Due to the brick kilns, the Vidrupa river basin became narrow | वीटभट्ट्यांमुळे विद्रुपा नदीपात्र झाले अरुंद

वीटभट्ट्यांमुळे विद्रुपा नदीपात्र झाले अरुंद

सखाराम शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : शहरातून वाहणाऱ्या विद्रुपा नदीला गेल्या अनेक वर्षांपासून नालीचे स्वरूप आले आहे. याच नदीवर बाभळीचा वेढा, मोठमोठे गवत उगवल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तर जमादारणीच्या पुलाजवळ अनेक वीटभट्ट्यावाल्यांनी नदीपात्रात माती, विटाचा भुगा टाकून अतिक्रमण केले आहे. यामुळे नदीपात्र अरुंद झाले आहे.

विद्रुपा नदीत गेवराई शहरातील नालीचे पाणी सोडले जाते. सिंदखेड रोडपासून ते शहरातील जमादारणीच्या पुलापर्यंत या नदीपात्रात मोठमोठाल्या बाभळी व गवत उगवल्याने घाणीचा विळखा पडला आहे. या नदीपात्राजवळून गेले, तरी दुर्गंधी येत आहे. जमादारणीच्या पुलाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून वीटभट्या असून, या भट्टी मालकाने विद्रुपा नदीपात्रात अतिक्रमण केले आहे. नदीमध्ये माती व विटाचा भुगा टाकून नदीपात्राची रुंदी कमी केली आहे. याच पुलाजवळ मास विक्रेते बसत असल्याने, कोंबड्याचे पंख व घाण नदीत टाकली जात असल्याने, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याला या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे, तरी या नदीची पावसाळ्याआधी नदीमधील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

....

अतिक्रमण हटविणार

विद्रुपा नदीपात्र नगरपरिषदेच्या हद्दीत येत नाही, तरीही मान्सूनपूर्व तयारी म्हणून या नदीपात्रातील घाणीची साफसफाई करून वीटभट्टीवाल्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात येइल, असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी सांगितले.

===Photopath===

230521\20210521_131820_14.jpg

===Caption===

गेवराई शहराजवळून वाहणा-या विदूपा नदीपात्रात वीटभट्टी मालकांनी केलेले अतिक्रमण.

Web Title: Due to the brick kilns, the Vidrupa river basin became narrow