पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने ऊसतोड मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:54 IST2018-11-13T23:53:32+5:302018-11-13T23:54:44+5:30

सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यावर गेलेल्या धारूर तालुक्यातील शेतमजुराचा पिसाळलेल्या कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटे घडली.

Due to biting the dog with bitten dog bite death | पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने ऊसतोड मजुराचा मृत्यू

पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने ऊसतोड मजुराचा मृत्यू

धारूर : सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यावर गेलेल्या धारूर तालुक्यातील शेतमजुराचा पिसाळलेल्या कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटे घडली. मुंजाहरी लक्ष्मण कोपरेटकर (वय ३५, रा. मोरफळी, ता. धारूर) असे मयत ऊसतोड मजुराचे नाव आहे. पंधरा दिवसापूर्वी ते सोलापूर जिल्ह्यातील जाक्राई कारखान्यावर गेले होते. तिथे सोमवारी रात्री काम करत असताना त्यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या मुंजाहरी यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक होत गेली. मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव मोरफळी येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत मुंजाहरी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. परिस्थिती हलाखीची असताना घरातील कर्ता पुरुष गेल्याने कोपरेटकर कुटुंब उघड्यावर आले आहे.

Web Title: Due to biting the dog with bitten dog bite death