व्यापाऱ्यांना लुटण्याच्या कटात सहभागी चालक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 19:05 IST2019-07-02T19:04:48+5:302019-07-02T19:05:55+5:30
पोलीसांनी चौकशी केली असता या कटामध्ये चालकाचा हात असल्याचे निष्पन्न झाले.

व्यापाऱ्यांना लुटण्याच्या कटात सहभागी चालक अटकेत
गेवराई (बीड ) : माजलगावहून नाशिककडे फळे आणण्यासाठी जाणार्या व्यापार्यांना भेंडफाट्याजवळ चोरट्याने चाकूचा धाक दाखवून दोन लाखाला लुटले याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी पोलीसांनी पिकअप चालकाची सखोल चौकशी केली असता या कटामध्ये त्याचा हात असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी चालकाला अटक केली आहे.
फारूक हमीदसह अन्य दोन व्यापारी पिकअप क्रमांक एम.एच.२२ एए ३०३६ यामध्ये फळे आणण्यासाठी नाशिकला जात होते. रात्री दहा वाजता हे व्यापारी चहा पिण्यासाठी गेवराई तालुक्यातील भेंट फाटा या ठिकाणी थांबले होते. यावेळी तीन ते चार चोरट्याने व्यापार्यांना चाकू दाखवून त्यांच्याकडील दोन लाख रूपये लुटले. या लुटीमागे पिकअप चालक शेख असलम याचा हात असल्याचा संशय व्यापार्यांना आल्यानंतर याबाबतची माहिती व्यापार्यांनी पोलीसांना दिली. पोलीसांनी शेख असलम याला आपला खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी डिवायएसपी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उणवणे, बहिरवाळ, वडकर, मुंजाळ हे कर्मचारी अधिक तपास करत आहेत. आरोपी पिकअप चालकाला अटक करण्यात आली.