शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

चालक, क्लिनर जेवायला थांबले अन् पोलिसांनी पकडला ४५ लाखांचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:57 IST

उस्मानाबादहून जालन्याकडे जाणारा ट्रक गढीजवळ एका हॉटेलवर चालकांनी जेवणासाठी थांबविले. याचवेळी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकली.

ठळक मुद्देगेवराईजवळ पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई

गेवराई : उस्मानाबादहून जालन्याकडे जाणारा ट्रक गढीजवळ एका हॉटेलवर चालकांनी जेवणासाठी थांबविले. याचवेळी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकली. यामध्ये ४५ लाख रूपयांचा गुटखा आणि ट्रक असा ५५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोघांना ताब्यातही घेतले. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली.उस्मानाबादहून आलेला ट्रक (एमएच १८/एए ६८४५) गेवराई-गढी रस्त्यावर चालकांनी जेवणासाठी थांबविला. हीच माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सापळा लावला. चालक जेवणात व्यस्त असतानाच पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ट्रकमध्ये गुटखा असल्याची खात्री केली. जेवण संपवून चालक, क्लिनर ट्रकमध्ये बसून निघण्याच्या तयारीत असतानाच पथकातील कर्मचाºयांनी झडप घालत त्यांना पकडले. एकनाथ दत्तु परदेशी (रा.संजय नगर, ता.श्रीरामपुर, जि. अहमदनगर), शेख जब्बार शेख (रा.जे.पी रोड, लोहगाव पुणे) अशी पकडलेल्यांची नावे आहेत. ट्रकची पडताळणी केली असता त्यामध्ये गुटख्याने भरलेल्या ८० पिशव्या दिसल्या. याची किंमत अंदाजे ४५ लाख रूपये असल्याचे सांगण्यात येत असून ट्रकही ताब्यात घेतला आहे. असा एकूण ५५ लाख रूपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला. अन्न व औषध प्रशासनाला याबाबत कळविण्यात आलेले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार आणि अनिकेत भिसे यांच्याकडून पंचनामा झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोनि दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भूषण सोनार, पथक प्रमुख उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, गणेश नवले, अंकुश वरपे, रेवननाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली.राजापुरमध्ये टिप्पर पकडलागेवराई तालुक्यातील राजापूर येथून अवैध वाळू उपसा करणारे टिप्परही विशेष पथकाने पकडले. चालकाला ताब्यात घेत तलवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. जवळपास १५ लाख ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयातअहवाल पाठविल्याचे तलवाडा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी