शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

माजलगाव धरणाच्या आरक्षित पाण्यावर डल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 10:57 IST

पावसाने पाठ फिरवल्याने माजलगाव धरणातील सध्याचा १३ % पाणी साठा जिल्हाधिका-यांनी आरक्षीत केला आहे. असे असतानाही धरणाच्या बॅकवाटर मधुन  मोठयाप्रमाणावर विनापरवाना पाणी उपसा सुरु आहे.

ठळक मुद्दे शिल्लक असलेला १३ % पाणी साठा जिल्हाधिका-यांनी आरक्षीत केला आहे. सध्या धरणाच्या बॅक वाॅटरमधून जवळपास १५००  मोटारद्वारे अनधिकृतरित्या पाणी उपसा होत आहे.

ऑनलाईन लोकमत 

माजलगांव (बीड), दि. ७ : पावसाने पाठ फिरवल्याने माजलगाव धरणातील सध्या शिल्लक असलेला १३ % पाणी साठा जिल्हाधिका-यांनी आरक्षीत केला आहे. असे असतानाही धरणाच्या बॅकवाटर मधुन  मोठयाप्रमाणावर विनापरवाना पाणी उपसा सुरु आहे. या अनियंत्रित पाणी उपस्याने पुढे जर पाऊस कमी पडला तर भविष्यात पाण्याची मोठी समस्या उद्भवू शकते. 

बीड जिल्यात तसेच तालुक्यात अत्यंत अल्प प्रमाणात पाउस झालेला आहे त्यामुळे माजलगांव धरणात  एक थेंबही पाणी आलेले नाही. सध्या धरणात अवघे १३ टक्के पाणी शिल्लक आहे. मागील दोन महिन्यांपासुन पावसाने दडी मारल्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागु शकतो म्हणुन शिल्लक पाणी साठा जिल्हाधिका-यांनी आरक्षीत केला आहे. मात्र, या आरक्षीत पाण्यावर राजरोज खाजगी लोकांकडुन डल्ला मारला जात असुन रात्रंदिवस शेकडो मोटारींद्वारे पाणी उपसा सुरु आहे. या अनियंत्रित उपस्याने दिवसेंदिवस धरणाच्या पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या बाबत जलसिंचन विभागाने अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारची पाउले उचलली नसल्यामुळे या खाजगी पाणी उपसा करणारांचे मोठे फावत आहे.  

धरणाच्या बॅकवाॅटरसाठी मागील ३० च्या कालावधीत केवळ १५८६ जणांनी परवाने  घेतलेले आहेत. त्यातही कांही लोकांनी केवळ बॅंकप्रपोजलसाठी हे परवाने घेतलेले आहेत प्रत्यक्ष परवान्याद्वारे पाणी उपसा करणारांची संख्या केवळ २५०  ते ३००  आहे. मात्र, सध्या धरणाच्या बॅक वाॅटरमधून जवळपास १५००  मोटारद्वारे पाणी उपसा होत आहे. हा अनधिकृतरि पाणी उपसा तात्काळ थांबवुन संबंधीतांवर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे. 

फौजदारी गुन्हे दाखल करू  बॅकवाॅटरवरुन विनापरवाना पाणी उपसा करणा-यावर कारवाईसाठी तहसील, पोलीस आणि आमच्या कार्यालयाचे मिळुन संयुक्त पथक तात्काळ स्थापन करण्यात येईल. याद्वारे धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात येणार आहे.  चोरुन पाणी उपसा करणा-यांवर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. -व्ही. आर. फड, शाखा अभियंता, माजलगांव उपसा सिंचन शाखा क्र. 2