चाटगाव तलावाचा सांडवा अज्ञात व्यक्तीने फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:38 IST2021-08-12T04:38:30+5:302021-08-12T04:38:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धारुर : तालुक्यातील चाटगाव येथील तलाव वरील सांडवा अज्ञात माथेफिरूने फोडल्याची घटना सोमवारी रात्री दरम्यान घडली. ...

The drain of Chatgaon lake was broken by an unknown person | चाटगाव तलावाचा सांडवा अज्ञात व्यक्तीने फोडला

चाटगाव तलावाचा सांडवा अज्ञात व्यक्तीने फोडला

लोकमत न्यूज नेटवर्क

धारुर : तालुक्यातील चाटगाव येथील तलाव वरील सांडवा अज्ञात माथेफिरूने फोडल्याची घटना सोमवारी रात्री दरम्यान घडली. तलावातून लाखो लिटर पाणी वाया जात असून. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

यंदा बालाघाटच्या डोंगरात पट्ट्यात सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे चाटगाव येथील तलाव ९८ टक्के भरला होता. चाटगाव, दिंद्रूड, संगमसह पाच ते सहा गावच्या शिवारात शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी या तलावातून वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध होते. तलावातील संपादित क्षेत्रात काही शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे पीक लागवड केलेली असून ती पिके पाण्याखाली जात असल्याने तलावाचा सांडवा फोडण्याचे काम कोणीतरी केले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. सांडव्याची चिरेबंदी भिंत एक फूट उंच खोल जवळपास चार फूट रुंद फोडण्यात आली आहे. पाण्याचा दाब वाढल्यास भिंतीला मोठे भगदाड पडू शकते. त्यामुळे संगम सह अनेक गावांना व शेतीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

...

कारवाई करणार

दरम्यान, पाटबंधारे विभागाशी संपर्क केला असता वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे तेथील कर्मचा-यांनी सांगितले. चाटगाव, दिंद्रुड व संगम ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे

100821\img-20210810-wa0074.jpg

चाटगाव तलावाचा सांडवा अज्ञात व्यक्तीने फोडल्याचे दिसत आहे.

Web Title: The drain of Chatgaon lake was broken by an unknown person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.