बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2022 15:25 IST2022-08-16T15:21:16+5:302022-08-16T15:25:02+5:30

सामाजिक न्याय विभागामार्फत धनंजय मुंडे हे त्या विभागाचे मंत्री असताना एप्रिल 2022 मध्ये या कामासाठी त्यांनी 1 कोटी 32 लाख रुपये निधी मंजूर केला होता.

Dr. Babasaheb Ambedkar memorial work has started in bardapur | बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा उभारणी व सुशोभिकरण स्मारक कामाचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. सामाजिक न्याय विभागामार्फत धनंजय मुंडे हे त्या विभागाचे मंत्री असताना एप्रिल 2022 मध्ये या कामासाठी त्यांनी 1 कोटी 32 लाख रुपये निधी मंजूर केला होता.

काही महिन्यांपूर्वी बर्दापुर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. त्यानंतर या ठिकाणी नवीन स्मारक उभारण्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानंतर याचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या उपस्थित झाले आहे.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar memorial work has started in bardapur