शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हाधिकारी पाठक यांच्यावर शंका, प्रकरण दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे द्या; याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 19:27 IST

औरंगाबाद खंडपीठात केली याचिकेद्वारे मागणी

बीड : पाटोदा येथील नगरसेवकांच्या अपात्रप्रकरणाचा निकाल बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वर्षापासून राखून ठेवला आहे. पाठक यांच्याकडून न्याय मिळवण्याची शंका निर्माण झाल्यामुळे दोन्ही अपील दुसऱ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करावे, अशी मागणी शेख मोबीन शेख हमीद यांनी याचिकेद्वारे औरंगाबाद खंडपीठात केली आहे. याची सुनावणी १५ एप्रिलला होणार आहे.

पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक सय्यद अब्दुल्ला सय्यद यासीन, तसेच बळीराम बाबासाहेब पोटे यांनी त्यांच्या पाटोदा नगर पंचायतच्या नगरसेवक कालावधीमध्ये त्यांच्या स्वतःच्या मुलांना पाटोदा पंचायतीचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. ऑडिटमध्ये तत्कालीन नगरसेवक व ठेकेदार यांच्यावर रकमा व वसुलीचे निर्देश असल्यामुळे पाटोदा येथील शेख मोबीन शेख हमीद, अबलूक घुगे, शिवभूषण जाधव यांनी जून २०२३ मध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरणे दाखल करून सय्यद अब्दुल्ला सय्यद यासीन व बळीराम बाबासाहेब पोटे यांना नगरसेवक म्हणून अपात्र करण्याची विनंती केली होती. सदरील प्रकरणांमध्ये १२ मार्च २०२४ रोजी तत्कालिन जिल्हाधिकारी यांच्यापुढे सुनावणी झाली होती. सदरील प्रकरण निकालासाठी राखीव करण्यात आले होते, परंतु सदरील प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी ऑगस्ट २०२४ पर्यंत कुठलाही निकाल दिलेला नाही.

शेख, घुगे व जाधव यांनी २१ ऑगस्ट २०२४ रोजी सचिवांसह विभागीय आयुक्तांना लेखी अर्ज करुन अपात्रतेच्या प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून न्याय मिळण्याबाबत शंका व्यक्त केली. सय्यद अब्दुल्ला हे राजकीय दृष्ट्या प्रभावी असून, माजी बीड जिल्हा परिषद अध्यक्ष होते. तसेच, बळीराम पोटे प्रभावी राजकारणी आहे. दोघेही भाजप आ. सुरेश धस यांच्या जवळचे असून दोघांचेही जिल्हाधिकारी पाठक यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. पाठक यांनी बीड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून काम केले आहे. त्यामुळे दोन्ही अपील दुसऱ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करून त्या सुनावणीचा टाइम बॉण्ड करून प्रकरणाचा निकाल देण्यात यावा, अशी विनंती केली होती. मात्र, सदरील प्रकरणांमध्ये एक वर्षाचा कालावधी लोटूनही निकाल न दिल्याने कायद्यामध्ये अपात्रतेच्या तरतुदीचा मूळ आदेश भंग होत असून, जिल्हाधिकारी पाठक यांच्याकडील वरील दोन्ही प्रकरणे औरंगाबाद महसूल विभागातील दुसऱ्या कोणत्याही जिल्हाधिकारी यांच्याकडे वरील प्रकरणे वर्ग करावे, अशी विनंती याचिकेद्वारे केली आहे.

सचिवासह बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीससदरील याचिकेची सुनावणी न्या. मंगेश पाटील व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्या पुढे झाली. सदरील प्रकरणात मुंबई येथील महाराष्ट्र राज्य मंत्रालयाचे शहर विकास सचिव, छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त, बीड जिल्हाधिकारी, तसेच सय्यद अब्दुल्ला व बळी बाबासाहेब पोटे यांना नोटीस काढल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील अपात्रतेच्या प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारित करू नये, असा आदेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी होणार आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. नरसिंह जाधव यांनी काम पाहिले व त्यांना ॲड. सोनाली सोमवंशी, ॲड. रवींद्र वानखेडे, ॲड. गौरव खांडे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठBeedबीड