शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

डॉक्टर, परिचारिका दहशतीखाली; आरोपींना मिळतेय अभय; एसपींकडे करणार तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 1:20 AM

जिल्हा रूग्णालयात कार्यरत डॉक्टर, परिचारिकांना धक्काबुक्की केली जात असल्याने ते दहशतीखाली काम करीत आहेत. तक्रार देऊनही बीड शहर पोलिसांकडून आरोपीला अटक न केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील जिल्हा रूग्णालयात कार्यरत डॉक्टर, परिचारिकांना धक्काबुक्की केली जात असल्याने ते दहशतीखाली काम करीत आहेत. तक्रार देऊनही बीड शहर पोलिसांकडून आरोपीला अटक न केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या आरोपींना बीड शहर पोलिसांचे अभय असल्याचा आरोपही रूग्णालय कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे.१७ एप्रिल रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रूग्णाच्या मुलाने परिचारिकेला धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळ केली होती. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. या घटनेला १३ दिवस उलटूूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. तसेच चार दिवसांपूर्वी अपघात विभागात कार्यरत असलेल्या डॉ.संजय राऊत यांना एका व्यक्तीने सर्वांसमोर शिवीगाळ केली.याची तक्रार डॉ.राऊत यांनी बीड शहर पोलिसांकडे दिली. अर्ज प्राप्त झाल्यानंतरही बीड शहर पोलिसांकडून आरोपीचा अद्याप शोध घेतलेला नाही. तर रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका मद्यपी रूग्णाने व त्याच्या नातेवाईकाने एका डॉक्टरला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच येथील रजिस्टरही फाडून फेकले.मात्र, हे प्रकरण कागदावर आले नाही. मिळालेल्या माहितीनूसार पोलीस आरोपींना पाठिशी घालत असल्यानेच या डॉक्टरने तक्रार दिली नसल्याचे सांगण्यात आले. या सर्व घटनेवरून बीड शहर पोलिसांच्या कामगिरीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता परिचारीक व डॉक्टर हे बीड शहर पोलिसांच्या विरोधात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सूत्रांनी सांगण्यात आले. रुग्णालयात डॉक्टर, परिचारिकांना पुरेशी सुरक्षितता देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरEmployeeकर्मचारी