आष्टी ग्रामीण रुग्णालयात जिल्हा चिकित्सकांची धावती भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:40+5:302021-07-08T04:22:40+5:30
आष्टी : येथील ग्रामीण रुग्णालयास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी मंगळवारी धावती भेट देऊन रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेतला. ...

आष्टी ग्रामीण रुग्णालयात जिल्हा चिकित्सकांची धावती भेट
आष्टी : येथील ग्रामीण रुग्णालयास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी मंगळवारी धावती भेट देऊन रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींबाबत चर्चा केली. रुग्णांची विचारपूस करून उपचार वेळेत मिळतो का? याची चौकशी करून कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.
आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी अचानक सायंकाळी जिल्हा चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती केंद्राची पाहणी केली. लवकरच ब्लड स्टोअरेज सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोविड सेंटर, प्रयोगशाळा, आयसीटीसी, एक्स-रे, आयुष या सर्व विभागांची पाहणी करून केलेल्या कामाबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मोराळे, डॉ.गुट्टे, डॉ.मोहोळकर, डॉ.जावळे, डॉ. इमरान शेख, डॉ.कवाडे, जयचंद नेलवाडे, अधिपरिचारिका शेख, भोपळे, बनकर, सुजाता दहिफळे, अश्विनी झिंजुरे, रजनीश कांबळे, गायकवाड, हराळ व रुग्णालयातील आदी कर्मचारी उपस्थित होते.
070721\07bed_1_07072021_14.jpg