District Court rejects bail application of Nagaradhkshya Sahal Chaus | नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला

नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला

ठळक मुद्देमाजलगाव नगर परिषद अपहार प्रकरण

माजलगाव : येथील नगर परिषदेत अपहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले नगराध्यक्ष सहाल चाऊस व लेखापाल अशोक कुलकर्णी यांचा जामीन अर्ज बुधवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

नगर परिषदेत कोट्यवधी रुपयांचा अपहार प्रकरणात प्रकरणात नगराध्यक्ष चाऊस यांना  दि.४ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली होती. तर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, लेखापाल अशोक कुलकर्णी वांगीकर हे दोघे स्वतः पोलिसांकडे हजर झाले होते. या तिघांनाही  येथील न्यायालयाने  पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर चाऊस व येलगट्टे यांची दि.११ पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता, दि.११ रोजी मुख्याधिकारी येलगट्टे यांची सुटका झाली तर चाऊस व कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावर चाऊस यांच्या वकिलांनी जामीन मिळावी म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता, त्यावर बुधवारी सकाळी अकरा वाजता न्यायदंडाधिकारी एस पी देशमुख यांनी हा अर्ज फेटाळून लावला.

Web Title: District Court rejects bail application of Nagaradhkshya Sahal Chaus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.