सफाई कामगारांना मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:31 IST2021-05-24T04:31:55+5:302021-05-24T04:31:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने शुक्रवारी ...

सफाई कामगारांना मास्कचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई :
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने शुक्रवारी अभिवादन केले. यावेळी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील ५० महिला व १०० पुरूष सफाई कामगारांना शुक्रवारी मास्कचे वाटप करण्यात आले.
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी मास्क वाटपाचा उपक्रम राबविला. प्रास्ताविक नगरसेवक महादेव आदमाने यांनी केले. आभार आनंद टाकळकर यांनी मानले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक सुनील व्यवहारे, राणा चव्हाण, भारत जोगदंड, अमोल मिसाळ, प्रताप देवकर, सचिन जाधव, स्वच्छता विभागातील प्रमुख श्रीकांत थोरात, भरत लखेरा, संजय कदम यांची यावेळी उपस्थिती होती.
...
जनसेवेसाठी काँग्रेस कटिबध्द
मागील काही महिन्यांपूर्वीच गरजू कुटुंबीयांना किराणा साहित्य, अन्नधान्य वाटप करण्यात आले. मास्क, सॅनिटायझर वाटप केले. बीड जिल्ह्यातील परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्यात आली. गरजू रूग्णांना वैद्यकीय मदत व साहाय्यता केली. एक हजाराच्या जवळपास काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी वेळोवेळी रक्तदान केले. पुढील काळातही आम्ही जनसेवेसाठी कटिबद्ध आहोत, असे राजकिशोर मोदी यांनी यावेळी सांगितले.
===Photopath===
230521\avinash mudegaonkar_img-20210521-wa0070_14.jpg
===Caption===
भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अंबाजोगाई नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील सफाई कामगारांना मास्कचे वाटप करताना जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी व पदाधिकारी.