दहा गरजू कुटुंबांना विवाह साहाय्य निधीचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:31 IST2021-05-24T04:31:46+5:302021-05-24T04:31:46+5:30
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कोविड प्रादुर्भावातील लोकोपयोगी सेवाधर्म उपक्रम राबविला जात आहे. या ...

दहा गरजू कुटुंबांना विवाह साहाय्य निधीचे वितरण
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कोविड प्रादुर्भावातील लोकोपयोगी सेवाधर्म उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत परळीतील सुरेश आढाव, आश्रोबा होके, माणिकराव पोटभरे, रणजित पुरभय्ये, दौलत सरदार खान पठाण, अजयराव दंडगुले, सलीमखान रशीद खान, खेत्रे, तरकसे, कांबळे या दहा गरजू कुटुंबांतील विवाहासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी मुंडे यांच्या जगन्मित्र कार्यलयात वितरित करण्यात आला. यावेळी न.प. गटनेते वाल्मीक कराड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक, शंकर आडेपवार, श्रीकृष्ण कराड, नगरसेवक विजय भोयटे, माजी नगरसेवक वैजनाथ बागवाले, नगरसेवक अनिल आष्टेकर, सरचिटणीस अनंत इंगळे, शेख शम्मो, रवी मुळे, शेख मुख्तार आदी उपस्थित होते.
कोविडच्या प्रादुर्भावात आपल्याजवळची अनेक सोन्यासारखी माणसे मरण पावली. काही व्यक्ती कुटुंबप्रमुख होत्या आणि त्यांचे हातावर पोट होते, अशा किशोर स्वामी व वीरभद्र समशेट्टी या दोन्ही कुटुंबांना सेवा टीमने गरज ओळखून तात्काळ साहाय्य म्हणून मदत केली. ही मदत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व धनंजय मुंडे हेल्पलाइनच्या माध्यमातून करण्यात आली.
-बाजीराव धर्माधिकारी, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, परळी
===Photopath===
220521\1204img-20210522-wa0404.jpg
===Caption===
परळीतील गरजू कुटुंबांना सहाय्य निधी वितरित करण्यात आला..