मानवलोक जनसहयोगतर्फे २०० गरजूंना किराणा किट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:21+5:302021-06-23T04:22:21+5:30
अंबाजोगाई : येथील मानवलोक जनसहयोगतर्फे २०० गरजूंना किराणा साहित्याचे किट वाटप करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लाॅकडाऊनमध्ये ज्यांच्या ...

मानवलोक जनसहयोगतर्फे २०० गरजूंना किराणा किट वाटप
अंबाजोगाई : येथील मानवलोक जनसहयोगतर्फे २०० गरजूंना किराणा साहित्याचे किट वाटप करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लाॅकडाऊनमध्ये ज्यांच्या हाताला काम नव्हते, अशा १३०० गरजूंना याचा लाभ देण्यात आला. शहरी व ग्रामीण अशा ४००० गरजू कुटुंबांना किराणा साहित्य पोहचविण्यात येणार असल्याचे मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी सांगितले.
येथील जनसहयोगच्या कार्यालयात सकाळी गरजू व गरीब महिलांना किराणा साहित्याच्या किटचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी प्रशांत बर्दापूरकर, रवी मठपती यांची उपस्थिती होती. जनसहयोगचे श्याम सरवदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी याचे नियोजन केले.
शहरातील प्रत्येक काॅलनीतील गरजू कुटुंबांची निवड करून त्यांना हे एक महिना पुरेल एवढे किराणा साहित्याच्या किट देण्यात येत आहेत. त्यात तांदूळ, गोडेतेल, शेंगदाणे, साखर, साबण, मिठ-मसाला असे एक हजार रुपये किमतीच्या किराणा साहित्याचा समावेश आहे. जनसहयोगचे कार्यकर्ते त्या-त्या भागात फिरून माहिती घेत गरजू कुटुंबांची निवड करतात, अशी माहिती श्याम सरवदे यांनी दिली.
गिव्ह इंडिया या संस्थेच्या मदत निधीतून मानवलोक हा उपक्रम राबवत आहे. योग्य व गरजू कुटुंबांपर्यंत ही मदत पोचविण्याचा प्रयत्न आहे. तालुक्यात ४ हजार गरजू कुटुंबांना ही मदत पोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी सांगितले.
===Photopath===
220621\img-20210621-wa0116_14.jpg