राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थींना धनादेशाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:41 IST2021-06-09T04:41:08+5:302021-06-09T04:41:08+5:30
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस एक रकमी २० ...

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थींना धनादेशाचे वाटप
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस एक रकमी २० हजार रुपयांची मदत या योजनेंतर्गत करण्यात येते. दरम्यान, ४७ कुटुंबातील वारसांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे पालकमंत्री मुंडेंच्या हस्ते सोमवारी परळीतील चेमरी रेस्ट हाऊस येथे वितरण करण्यात आले आहे. यावेळी सर्व लाभार्थींना एक रोप भेट देण्यात आले असून, त्याचे संवर्धन करावे, असे आवाहनही केले आहे. या कार्यक्रमास जि. प. गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मीक कराड, दीपक देशमुख, बाजीराव धर्माधिकारी, राजाभाऊ पौळ, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार रुपनर, अनंत इंगळे, रवींद्र परदेशी आदी उपस्थित होते.
===Photopath===
080621\08_2_bed_3_08062021_14.jpeg
===Caption===
धनादेश वितरण