११ हजार मास्क व आरोग्य साहित्याचे वाटप - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:40+5:302021-06-02T04:25:40+5:30

अंबेजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची दक्षता म्हणून केज मतदार संघात ११ हजार मास्क व आरोग्य साहित्याचे वाटप आ.नमिता ...

Distribution of 11,000 masks and health materials - A | ११ हजार मास्क व आरोग्य साहित्याचे वाटप - A

११ हजार मास्क व आरोग्य साहित्याचे वाटप - A

अंबेजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची दक्षता म्हणून केज मतदार संघात ११ हजार मास्क व आरोग्य साहित्याचे वाटप आ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या वतीने करण्यात आले.

स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा उपक्रम राबविण्यात आला. शनिवारी आ.मुंदडा यांच्या उपस्थितीत अंबेजोगाई शहर व परिसरात मास्क व आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील आशा वर्कर्स यांच्या कामाचे कौतुक करून, त्यांना आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच आ.मुंदडा यांनी नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी, अंगणवाडीसेविका व कुत्तरविहीर येथील लसीकरण केंद्रात भेटी देऊन, सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेत त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी तालुका आरोग्य आधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे, डॉ.प्रदीप दामा, तालुका समूह संघटक काजी तबसुम, शेख शम्मी, नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे, शेख ताहेर, हानुमंत तौर, खलील मोलाना, बालासाहेब पाथरकर, हिदुलाल काकडे, ॲड.संतोष लोमटे, वैजनाथ देशमुख, कल्याण काळे, अनंत अरसुडे, गोपाळ मस्के, महेश अंबाड, संतोष जिरे, राहुल कापसे, मयुर रणखांब यांची उपस्थिती होती.

फोटो : स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आ.नमिता मुंदडा यांच्या वतीने मास्क, आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची भेट घेऊ, त्यांच्या कामाची प्रशंसा करीत आ.मुंदडा यांनी प्रोत्साहन दिले.

===Photopath===

300521\4846avinash mudegaonkar_img-20210530-wa0064_14.jpg

Web Title: Distribution of 11,000 masks and health materials - A