अंगणात स्वच्छता करणाऱ्या महिलेच्या विनयभंग; शेजाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 07:10 PM2019-12-18T19:10:02+5:302019-12-18T19:10:56+5:30

आरोपी भरत गायकवाड याला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. 

Disobedience to a woman cleaning the courtyard; One year rigorous imprisonment for the neighbor | अंगणात स्वच्छता करणाऱ्या महिलेच्या विनयभंग; शेजाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

अंगणात स्वच्छता करणाऱ्या महिलेच्या विनयभंग; शेजाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

Next

अंबाजोगाई : सकाळच्या वेळी अंगण झाडत असलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या शेजाऱ्यास अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या. सी.एम. खारकर यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

विनयभंगाची ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील तळणी येथे घडली होती. येथील ३० वर्षीय पिडीता दि. २ मार्च २०१८ रोजी सकाळी ७ वाजता स्वत:च्या घरासमोरील अंगण झाडत असताना तिच्या घराशेजारी राहणाऱ्या भरत नागनाथ गायकवाड याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात भरत गायकवाड याच्यावर कलम ३५४ (अ)(i) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस हे.काॅ. सुधाकर केंद्रे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या. सी.एम. खारकर यांच्या न्यायालयासमोर झाली. सर्व साक्षी पुरावे लक्षात घेऊन न्या. खारकर यांनी आरोपी भरत गायकवाड याला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. 

याप्रकरणात फिर्यादीच्या वतीने सहा. सरकारी अभियोक्ता आरती निळेकर यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. एस.बी. गायकवाड आणि ॲड. एन.बी. केंद्रे यांनी सहकार्य केले.

Web Title: Disobedience to a woman cleaning the courtyard; One year rigorous imprisonment for the neighbor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.