वडवणीच्या १४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:09 AM2019-02-04T00:09:02+5:302019-02-04T00:09:52+5:30

खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या १४ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. वडवणी येथील खाजगी वसतिगृहात हा प्रकार घडला.

Disease from 14 students of Dewadhi | वडवणीच्या १४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

वडवणीच्या १४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकृती धोक्याबाहेर : खाजगी वसतिगृहातील प्रकार

बीड : खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या १४ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. वडवणी येथील खाजगी वसतिगृहात हा प्रकार घडला.
वडवणी शहरात साळिंबा रोडवर परमेश्वर चव्हाण यांचे ज्ञानगंगा हे खाजगी वसतिगृह आहे. त्यात ४० विद्यार्थी राहतात. रविवारी दुपारी ३ वाजता त्यांना बाजरीची भाकरी, वरण आणि भात असे जेवण देण्यात आले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांना उलटी, मळमळीचा त्रास सुरू झाला. खाजगी वाहनातून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वॉर्ड क्र. ९ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.


विद्यार्थ्यांची नावे
छत्रपती बाबुजी वगरे (१४), करण विजय सांगे (११), कृष्णा बाबासाहेब व्हरकटे (१२), कुणाल परमेश्वर राऊत (११), पंकज बंडू लवटे (९), उमेद दिलीप वायसे (१२), भीमराव प्रल्हाद शेळके (११), दत्ता बालासाहेब तोंडे (१४), आकाश मच्छिंद्र केकाण (९), करण दत्ता कांबळे (१०), अभिजित अनिल पवार (१०), योगेश बिभीषण हजारे (१२), सुदर्शन सुनील वैराळे (१२), नितीन ज्ञानेश्वर आडे (९) अशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

Web Title: Disease from 14 students of Dewadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.