जमलेल्या गर्दीमुळे जयदत्त क्षीरसागरांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:23 IST2019-02-08T00:22:29+5:302019-02-08T00:23:12+5:30
नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले, यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे व इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम घेतले.

जमलेल्या गर्दीमुळे जयदत्त क्षीरसागरांची चर्चा
बीड : नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले, यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे व इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम घेतले. यावेळी सभास्थळी झालेली गर्दी पाहून पुन्हा एकदा आ. जयदत्त क्षीरसागरांची जिल्हाभरात चर्चा झाली.
मागील काही काळापासून जिल्ह्यातील राष्ट्रवादीपासून दूर असलेले आ.जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पक्षीय भूमिकेकेडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यासह इतर मतदार संघावर आ. जयदत्त क्षीरसागर यांचा प्रभाव आहे. त्यामुळे भाजप देखील त्यांना जवळ करत आहे. म्हणूनच नगर पालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या कार्यक्रमास दिलेल्या निमंत्रणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या व पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. सुरेश धस, आ. आर. टी. देशमुख, माजी आ. बदामराव पंडित व इतर नेत्यांची उपस्थिती होती. मात्र, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याला या कार्यक्रमास आमंत्रित केले नव्हते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा आ. जयदत्त क्षीरसागर यांची पुढील निवडणुकीत काय भूमिका असेल अशी चर्चा रंगल्याचे पहायला मिळाले.
वरिष्ठांच्या भूमिकेकडे लक्ष
आ. जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमधून काय प्रतिक्रिया उमटतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.