ज्येष्ठांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST2021-06-16T04:44:30+5:302021-06-16T04:44:30+5:30

अंमलबजावणी होईना बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत ...

Disadvantages of seniors | ज्येष्ठांची गैरसोय

ज्येष्ठांची गैरसोय

अंमलबजावणी होईना

बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

रानडुकरांची धास्ती

अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहेत. याचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. याकडे वन विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रस्ता दुरुस्ती करा

बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटे वस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था बनली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे लक्ष दिले जात नाही.

हातपंप दुरुस्त करा

बीड : तालुक्यातील पालसिंगण परिसरातील हातपंप नादुरुस्त आहेत. अजूनही उन्हाळ्याची तीव्रता असल्याने हातपंप दुरुस्त करून घ्यावेत, अशी मागणी सरपंच विक्रम खंडागळे यांनी केली.

Web Title: Disadvantages of seniors