शासकीय कार्यालय परिसरात घाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST2021-02-13T04:33:09+5:302021-02-13T04:33:09+5:30
बीड : येथील विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. येथे काम करणारे कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या ...

शासकीय कार्यालय परिसरात घाण
बीड : येथील विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. येथे काम करणारे कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या विविध नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
भाजीमंडई परिसरात वाहतूक कोंडी
बीड : येथील भाजीमंडई परिसरात रस्त्यावरच अनेक पालेभाजी विक्रेते बसत असून, हातगाडेही लावण्यात येतात. भाजी खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहकही अस्ताव्यस्त वाहने लावतात. त्यामुळे रस्ता अरुंद बनत असून, ये-जा करणाऱ्या वाहनांना अडचण येत आहे. वाहतूक कोंडीमुळे अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवत असल्याचे दिसून येत आहे.
पथदिवे दिवसाही सुरू, नागरिकांमध्ये संताप
वडवणी : शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे दिवसाच सुरू राहत आहेत. मात्र, ऐन गरजेच्या वेळी रात्री पथदिवे बंद राहत असून, भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नगरपंचायतने याकडे लक्ष देऊन विजेचा अपव्यय टाळावा, अशी मागणी होत आहे.
नाल्यातील सांडपाणी रस्त्यांवर येऊ लागले
पाटोदा : शहरातील अनेक भागांमध्ये नालेसफाई झालेली नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे चिखल तयार होत असून, अनेक ठिकाणी दुचाकी घसरत आहेत. तसेच दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.