धारुरमध्ये तरुण व्यापाऱ्याने केली दुकानात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 17:05 IST2021-06-23T16:53:20+5:302021-06-23T17:05:57+5:30
शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानात केली आत्महत्या

धारुरमध्ये तरुण व्यापाऱ्याने केली दुकानात आत्महत्या
धारूर : येथील एका तरुण व्यापाऱ्याने मुख्य रस्त्यावरील आपल्या दुकानातच आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. धनंजय शिरीष पिलाजी (38) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे.
मुख्य रस्त्यावर धनंजय पिलाजी याचे न्यू श्रीकांत जनरल व मोबाईल सेंटर या नावाचे दुकान आहे. बुधवारी दुपारी दुकानातच त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. भर दुपारी हा प्रकार उघडकीस आल्याने लोकांनी गर्दी केली. त्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. घटनेचा पंचनामा करुन पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून कळते. घटनास्थळी पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी पाहणी केली.