शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंचा 'मै हुं डॉन' गाण्यावर ठेका; परळीत बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 13:32 IST

नाथरा येथे आ. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय मुंडे हे 648 मताने विजयी झाले आहेत.

- संजय खाकरेपरळी( बीड) : तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील समर्थकांच्या पॅनलने  बहुतांशी ग्रामपंचायतीत सरशी मिळून वर्चस्व सिद्ध केले आहे. दुपारी साडेबारापर्यंत हाती आलेल्या निकालात 28 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत  राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत समर्थकांचे पॅनल विजयी झाले आहे. तर 12 ठिकाणी भाजप पुरस्कृत समर्थकांच्या पॅनलला यश मिळाले आहे. 

नाथरा येथे आ. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय मुंडे हे 648 मताने विजयी झाले आहेत. नाथरा ग्रामपंचायत यापूर्वी आ धनंजय मुंडे यांच्या ताब्यात होती. यावेळी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी एकत्रित येऊन नाथरा सरपंच पदाची निवडणूक लढविली होती.

तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. अंबाजोगाईचे अप्पर जिल्हाधिकारी व निवडणूक निरीक्षक सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांच्या उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ झाला आहे

पहील्या फेरीत एकूण-29 टेबलवर 28 ग्रामपंचायत ची मतमोजणी करण्यात आली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने नाथरा, चांदापूर, बोधेगाव, दौंडवाडी, लोणारवाडी तेलसमुख, मैंदवाडी, वाघबेट, तेलघणा येथे सरपंच पदी विजय प्राप्त करून ग्रामपंचायती ताब्यात आणल्या आहेत तर जळगव्हान, लोणी, औरंगपूर,  परचुंडी येथे माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. मरळवाडी येथे अपक्ष पॅनेलने विजय प्राप्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरस्कृत पॅनलच्या विजयी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी तर भाजपच्या विजयी सरपंच व सदस्यांचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वागत केले आहे. 

दरम्यान, तालुक्यातील गाजलेल्या कन्हेरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रासपाचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्या मातोश्री प्रभावती फड विजयी झाल्या आहेत. तर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या धर्मापुरी ग्रामपंचायतीवर परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एडवोकेट गोविंद फड यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी गोविंद फड याविजयी झाल्या आहेत,

तहसील कार्यालयासमोर जल्लोषपरळी तहसील कार्यासमोरील प्रांगणात  विजयी  ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा एकच जल्लोष चालू आहे, गुलाल उधळून व पुष्पहार घालून नवीन सरपंच, सदस्यांचे स्वागत करण्यात येत आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचाकडेकोट बंदोबस्त आहे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कर पॅनल प्रमुखांना बळ दिले होते व गावात विकास कामासाठी निधी दिला होता व ते सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. दरम्यान विजयी जल्लोष करताना आ. धनंजय मुंडें यांनी 'मै हुं डॉन' गाण्यावर समर्थकांसह ठेका धरला. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड