शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परळीत अभूतपूर्व दृष्य: पंकजांची एंट्री, स्वागताला धनंजय मुंडे; निवडणुकीबद्दल भाऊ-बहीण म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 15:54 IST

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज परळी येथे पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलं.

Pankaja Munde Dhananjay Munde ( Marathi News ) : बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यंदा विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत पंकजा मुंडे यांना उमदेवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष महायुतीत सामील असल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचीही साथ पंकजा मुंडे यांना लाभणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज परळी येथे पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे पंकजा यांच्या स्वागताला धनंजय मुंडे हेदेखील गोपीनाथ गडावर उपस्थित होते.

जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत पंकजा मुंडे यांचं परळीत स्वागत करण्यात आलं. यावेळी पंकजा यांच्यासह धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडेही उपस्थित होत्या. तिघे भाऊ-बहीण अनेक वर्षांनंतर एकत्र आल्याने परळीकरही भारावून गेले. पंकजा यांचं स्वागत करत धनंजय मुंडे यांनी भावुक प्रतिक्रिया दिली. "माझ्यासाठी हा अत्यंत भावनिक दिवस आहे. ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत जिल्ह्याच्या बॉर्डवरच मी करायला सांगितलं होतं. मात्र ताईंनी सांगितलं की, तू पालकमंत्री आहेस, तू घरी थांब. मी तिथं भेटायला येणार आहे. परंतु मी तिचा मोठा भाऊ आहे आणि त्यामुळे मनाचा मोठेपणाही दाखवला पाहिजे, म्हणून सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी स्वागत करण्यासाठी आलो आहे," अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी आपल्या भावना मांडल्या.

बजरंग सोनवणेंना इशारा

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार असलेल्या बजरंग सोनवणे यांनी नुकताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर आज धनंजय मुंडेंनी सोनवणे यांचा समाचार घेतला आहे. "महायुतीतील जे कोणी सोडून गेलं, ते का गेलं, याची कारणं शोधून काढली पाहिजेत. त्यांची अतिमहत्त्वाकांक्षा याला कारणीभूत आहे. मागच्या निवडणुकीत आघाडी म्हणून आम्हीच त्यांचं काम केलं होतं. मात्र त्यांची ऐपत काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यांना आपल्या बहिणीला नगरपंचायत निवडणुकीत निवडून आणता आलं नाही, साधी ग्रामपंचायत निवडणूकही जिंकता आली नाही. जे जाणार होते, त्यांनी अगोदरच तयारी केली होती. आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत. ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. आमचा प्रारब्ध होता, तो आज संपला आहे. आम्ही सगळं कुटुंब आता एकत्र आहोत. आता कुणाचा प्रारब्ध सुरू करायचा ते आम्ही तिघं बहीण-भाऊ ठरवू," असा इशारा मुंडे यांनी दिला.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

परळीत झालेल्या जंगी स्वागतानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, "मला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पहिल्यांदाच आशीर्वाद घेण्यासाठी गोपीनाथ गडावर आली आहे. बीड जिल्ह्यात प्रवेश केल्यापासूनच लोकांनी ठिकठिकाणी मला अडवून सत्कार केला. त्यामुळे परळीत येताना मी मार्ग बदलून वेगळ्या मार्गाने आले. माझे बंधू आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनाही मी सांगितलं होतं की, काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी मी घरी येणार आहे. मात्र तरीही ते भाऊ म्हणून येथे स्वागताला आले," असं पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४beed-pcबीडparli-acपरळी