आज धनंजय मुंडे बीडमध्ये; तिन्ही गडांचे घेणार दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:18 IST2020-01-09T00:18:23+5:302020-01-09T00:18:44+5:30
उद्या ९ जानेवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे अहमदनगर, बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून ते नारायणगड, भगवानगड व गहिनीनाथगड या तीनही तीर्थस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत.

आज धनंजय मुंडे बीडमध्ये; तिन्ही गडांचे घेणार दर्शन
बीड : उद्या ९ जानेवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे अहमदनगर, बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून ते नारायणगड, भगवानगड व गहिनीनाथगड या तीनही तीर्थस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. सकाळी ११ वाजता ते हेलिकॉप्टरने बीड तालुक्यातील नारायणगड येथे दाखल होणार आहेत.
‘मंत्री झाल्यानंतर भगवानगडावर या’ असे निमंत्रण महंत नामदेव शास्त्री यांनी दिले होते. निमंत्रणानंतर मुंडे हे मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच बीड जिल्ह्यात येत आहेत. या तिन्ही गडांचे दर्शन करून महंतांचे आशिर्वाद घेणार आहेत.
या दौ-यात त्यांच्या समवेत आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे हे सोबत राहणार आहेत.
असा आहे दौरा
मुंडे यांचे श्रीक्षेत्र नारायणगड येथे मुंबईहून हेलिकॉप्टरने दुपारी साडेबारा वाजता आगमन होईल. तेथे संत नगद नारायण महाराज यांच्या दर्शनानंतर मुंडे हेलिकॉप्टरने भगवानगडाकडे रवाना होतील.
भगवानगड येथे भक्ती शक्तीची जुनी परंपरा असल्याने ते राष्टÑसंत भगवानबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतील.
भगवानगड येथून धनंजय मुंडे हे दुपारी अडीच वाजता मोटारीने टेम्भुर्णी - मानूर - टाकळी या मार्गाने पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथगडकडे जातील.
साडेचार वाजता गहिनीनाथगड येथे दर्शन घेऊन बीडकडे मोटारीने निघणार आहेत. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौºयावर येत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये व चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे.