शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'वाल्मीक कराडला तुरुंगात व्हीआयपी असल्यासारख्या सुविधा'; कोणत्या अधिकाऱ्यांवर आरोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 10:42 IST

दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी व्यक्तीसारख्या सोयी सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे देशमुख कुटुंबीयांनी घेतली आहेत. 

Walmik Karad News: दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचा आरोप होत असलेला वाल्मीक कराड सध्या तुरुंगात आहे. वाल्मीक कराडलातुरुंगात विशेष व्यक्तीसारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. धनंजय देशमुख यांनी हा आरोप केला असून, यापूर्वी भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. तुरुंगातील काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे घेत आता देशमुख कुटुंबीयांनी आरोप केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

वाल्मीक कराडला बीडमधील कारागृहात ठेवण्यात आले आहे. यापूर्वीही वाल्मीक कराडला विशेष व्यक्तीसारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. 

चहा, नाश्ता आणि विशेष खोलीत व्हिडीओ कॉन्फरन्सिग

वाल्मीक कराडला कोणत्या दिवशी किती वाजता कोणता अधिकारी वाल्मीक कराडला चहा आणि नाश्ता आणून देतो? कोणत्या दिवशी कोणत्या वेळी वाल्मीक कराड विशेष खोलीत जाऊन बसतो. तिथून तो व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे बोलणं होतं, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. धनंजय देशमुख यांनी एक पत्र तयार केले असून, त्यात वेळा आणि कर्मचाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे.  

वाल्मीक कराडला मोबाईल वापरण्याची सुविधा कर्मचार सुधाकर मुंडेंनी दिली आहे. वाल्मीक कराड, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनावणे यांना नियमबाह्य पद्धतीने एकाच बराकीमध्ये ठेवण्यात आले आहेत, असाही आरोप करण्यात आला आहे.  त्याचबरोबर तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, अशी मागणीही देशमुख कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. 

कोणत्या अधिकाऱ्यांवर आरोप?

तुरुंगातील बक्सर मुलाणी, ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, सुधाकर मुंडे हे अधिकारी-कर्मचारी वाल्मीक कराडला सहकार्य करत आहेत.  

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडSantosh Deshmukhसंतोष देशमुखjailतुरुंगBeed policeबीड पोलीस