शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

धम्मात जगाच्या कल्याणाचा विचार सामावला : भिक्खू ज्ञानरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:35 IST

चांदापूर बौद्ध धम्म परिषदेचा शानदार समारोप अंबाजोगाई : चांदापूर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ८ फेब्रुवारी २१ रोजी सातव्या बौद्ध ...

चांदापूर बौद्ध धम्म परिषदेचा शानदार समारोप

अंबाजोगाई :

चांदापूर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ८ फेब्रुवारी २१ रोजी सातव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेला भन्ते उपगुप्त महाथेरो (पूर्णा), भिक्खू ज्ञानरक्षित (औरंगाबाद), भिक्खू धम्मशील (हिंगोली/बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शंकरराव जगतकर नगरी, चांदापूर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती.

स्वागताध्यक्षपदी प्रा.प्रदीप रोडे हे होते.

या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीचे अध्यक्ष अ‍ॅड. अनंतराव जगतकर तर यावेळी आ. संजय दौंड यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी चंद्रशेखर वडमारे, भास्कर रोडे, डॉ. विनोद जगतकर, सरपंच बळीराम मिसाळ, उपसरपंच, अभियंता दत्तात्रय भिसे, प्रयागबाई मिसाळ, प्रा. दासू वाघमारे, परळीभूषण पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. माधव रोडे यांची उपस्थिती होती. संयोजन समितीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासन निर्देशानुसार सर्व निर्देशांचे पालन केले.

या प्रसंगी बोलताना आ.संजय दौंड यांनी चांदापूर येथील तक्षशिला बौद्ध धम्म प्रतिष्ठानला आपण यापुढील काळात सर्वोतोपरी सहकार्य व मदत करणार असल्याचे सांगून हा परिसर विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करू असे सांगत धम्म परिषदेच्या आयोजनासाठी दरवर्षी २५ हजार रूपये देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. पूज्य भदंत उपगुप्त महाथेरो यांनी चांदापूर हे निसर्गरम्य ठिकाण असल्याचे सांगून धम्म उपासकांनी धम्माचे आचरण करून दानाची भावनिकता वाढवावी. धम्म विचाराने परिवर्तन शक्य आहे. यापुढे धम्माचा विचार विस्तीर्ण करण्यासाठी कार्यरत राहू, उत्तम व चारित्र्यवान समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी उपगुप्त महाथेरो म्हणाले. भंते धम्मशील यांनी तथागत गौतम बुद्धांनी जगाला लोककल्याणाचा मार्ग सांगितला आहे. बुध्दाचा धम्म हा मनुष्याच्या कल्याणासाठी आहे, असे सांगितले. यावेळी भिक्खू ज्ञानरक्षित यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला तथागतांचा शुध्द धम्म दिला. भारतीय संविधानात मानवी कल्याणाचा जो विचार सामावला आहे. तो वंदनीय बाबासाहेबांनी त्रिपिटीकातून घेतला आहे. आपल्याला कायद्याने सुरक्षित केले आहे. धम्म विचारांत जगाच्या कल्याणाचे सुख सामावले असल्याचे यावेळी धम्मरक्षित यांनी सांगितले. प्रास्ताविक राजेंद्र घोडके यांनी केले.

स्वागताध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांनी चांदापूर येथे नवे ऊर्जा केेंद्र निर्माण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना अ‍ॅड. अनंतराव जगतकर यांनी बुद्ध धम्माची महती विषद केली. चारित्र्यसंपन्न व नीतीमान समाज निर्माण करण्यााठी धम्म आचरण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. जगतकर यांनी केले. या धम्म परिषदेत १४ विविध महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात येऊन ते पारित करण्यात आले.