शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

उपसभापतीची वीज तंत्रज्ञाला जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST

माजलगाव : तालुक्यातील ढोरगाव येथील लाईट लवकर का चालू करीत नाहीस म्हणून शिंदेवाडी फाटा येथे जाऊन महावितरण कंपनीच्या वरिष्ठ ...

माजलगाव : तालुक्यातील ढोरगाव येथील लाईट लवकर का चालू करीत नाहीस म्हणून शिंदेवाडी फाटा येथे जाऊन महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण केल्यानंतर आपल्या दवाखान्यात आणून बाथरूममध्ये कोंडून पुन्हा मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी माजलगाव पंचायत समितीचे उपसभापती वसीम मनसबदार व अनोळखी पाच जणांविरोधात शासकीय कामात अडथळा व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

विश्वास रोडे हे शिंदेवाडी तहत वसंतनगर तांडा या ठिकाणी शनिवारी दुपारी वीजबिल वसुलीचे काम करीत होते. यावेळी त्यांना पंचायत समितीचे उपसभापती डॉ. वसीम मनसबदार यांचा फोन आला. ढोरगाव येथील लाईट बंद आहे कधी चालू करणार असे विचारले, त्यावर इकडचे वसुलीचे काम संपल्यानंतर लाईट चालू करतो, असे रोडे यांनी सांगितले. परंतु मनसबदार यांनी लाईट आत्ताच सुरू कर व तू कुठे आहेस तिथेच थांब, असे म्हणून धमकावले. त्यानंतर डॉ. मनसबदार यांच्यासह अन्य पाच जण कारमधून शिंदेवाडी फाट्यावर आले. कारमधून उतरताच रोडे यांच्या तोंडावर चपटा मारत मुका मार देऊन बळजबरीने कारमध्ये घालून पात्रुड येथील डॉ. मनसबदार यांच्या दवाखान्यात आणले. तेथे बाथरूममध्ये कोंडून काठीने व पाईपने मारहाण केली. याप्रकरणी विश्वास रोडे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलिसात शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. पोलीस उपअधीक्षक सुरेश पाटील तपास हे करीत आहेत.