शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू डोके वर काढतोय; धारूरमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थाचा डेंग्यूमुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 14:22 IST

Death due to Dengue : मंगळवारी डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते

ठळक मुद्देधारुर शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू  आजाराची साथ सुरु आहे.कसबा विभागात डेंग्यूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे.

धारूर ( बीड ) : अभियांत्रिकीचे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा डेंग्यूमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ओम जगताप असे विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. जगताप कुटूंबियांवर ओढावलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

धारुर शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू  आजाराची साथ सुरु आहे. कसबा विभागात डेंग्यूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. या भागातील नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाला याची माहिती दिली आहे. डेंग्यूमुळे यापूर्वीही या भागात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील अॉपरेटर बाबासाहेब उर्फ नाना जगताप याच भागात राहतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा त्यांचा मुलगा ओमला (१९ ) मंगळवारी डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याची प्रकृती खालावली. अधिक उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली. 

ओम पत्रकार सुर्यकांत जगताप यांचा पुतण्या होत. अतिशय शिस्तप्रिय, अभ्यासू, शांत व संयमी स्वभावामुळे ओमची वेगळी ओळख होती. आज सकाळी ९ वाजता धारुर येथील स्मशानभुमीत त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अकाली निधनामुळे सर्वस्तरातून दुःख व्यक्त होत आहे

टॅग्स :Deathमृत्यूdengueडेंग्यूBeedबीड