शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सर्वांसाठी दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 01:08 IST

अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श समोर ठेवला आहे. तो मार्गदर्शक ठरत आहे, असे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी गोरगरिबांना आपले हक्क मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अशा महापुरूषांची जयंती विविध उपक्रमाने साजरी होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मानवतेची सेवा करून अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श समोर ठेवला आहे. तो आदर्श आजच्या तरूण पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरत आहे, असे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त सत्यशोधक प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरुण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, गणेश वाघमारे, दादाराव रोकडे, नितीन धांडे, अरूण बोंगाणे, नगरसेवक रवींद्र कदम, गणेश वाघमारे, दीपक थोरात आदी उपस्थित होते.जयदत्त क्षीरसागर म्हणाले, सत्यशोधक प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पुरस्कार घेणाऱ्या तरूण मंडळीमुळे अनेक गरजू लोकांना दिलासा मिळतो. साहित्यिक क्षेत्रात दर्जेदार आणि समाजाभिमुख लिखाण करून अण्णा भाऊ साठे यांनी गोरगरिबांना आपले हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला.देशात अशा महामानवाची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मानवतेची सेवा करून अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श निर्माण केला आहे. साहित्य क्षेत्रात विविध विषयावर त्यांचे लिखाण आजही समाजाला प्रेरणा देत असते.गुणवत्ता ही जाती धर्मावर आधारित नसते. माणसाचे कर्तृत्व हे आदर्श असावे लागते असे त्यांनी म्हटले.पुढे बोलताना ते म्हणाले, सामाजिक कायार्चा वसा आणि वारसा बीड जिल्ह्यात नेहमीच दिसत आला आहे. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. वंचित आणि उपेक्षित समाजासाठी आपण अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. अनेकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश मिळत आहे.विकासाचा दृष्टीकोन सर्वधर्म सम भावाची भूमिका ठेवतो. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे यासाठीच आपला प्रयत्न असतो. यापुढेही समाजाच्या सेवेसाठी जेथे पुढाकार घेऊन काम करायचे आहे तेथे नक्कीच करू असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.यावेळी सुमंत गायकवाड, सखाराम मस्के, बाबासाहेब थोरात, शिवाजीराव तांदळे, वैभव जोगदंड, सचिन अवचर, नितीन मुजमुले, अ‍ॅड.साळवे, प्रतिक अडागळे, लहू जाधव, सीमा ओस्तवाल उपस्थित होते.यांचा झाला सन्मानसत्यशोधक प्रतिष्ठाणच्या वतीने पुरस्कार वितरण व कर्मवीर एकनाथराव आव्हाड हेल्पलाईन नंबरचे लोकार्पण करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या आशा वरपे, मुसाखान, स्वाती अहिरे, सुनीता सोनवणे, संध्या धुरंधरे, साधना कुडके, संगीता जोगदंड, मुक्ता कदम, सुषमा सावळे, डॉ.परमेश्वर डोंगरे, डॉ.संकेत बाहेती, डॉ.किरण शिंदे, मनीषा उजगरे, उत्तम हजारे, मनीषा साळुंके, डॉ. संगीता पिंगळे, डॉ.संजय राऊत यांना रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरSocialसामाजिकBlood Bankरक्तपेढी