लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सर्वांसाठी दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 01:07 AM2019-09-27T01:07:24+5:302019-09-27T01:08:20+5:30

अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श समोर ठेवला आहे. तो मार्गदर्शक ठरत आहे, असे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.

Democratic Anna Bhau stockpile guide for all | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सर्वांसाठी दिशादर्शक

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सर्वांसाठी दिशादर्शक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी गोरगरिबांना आपले हक्क मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अशा महापुरूषांची जयंती विविध उपक्रमाने साजरी होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मानवतेची सेवा करून अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श समोर ठेवला आहे. तो आदर्श आजच्या तरूण पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरत आहे, असे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त सत्यशोधक प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरुण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, गणेश वाघमारे, दादाराव रोकडे, नितीन धांडे, अरूण बोंगाणे, नगरसेवक रवींद्र कदम, गणेश वाघमारे, दीपक थोरात आदी उपस्थित होते.
जयदत्त क्षीरसागर म्हणाले, सत्यशोधक प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पुरस्कार घेणाऱ्या तरूण मंडळीमुळे अनेक गरजू लोकांना दिलासा मिळतो. साहित्यिक क्षेत्रात दर्जेदार आणि समाजाभिमुख लिखाण करून अण्णा भाऊ साठे यांनी गोरगरिबांना आपले हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
देशात अशा महामानवाची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मानवतेची सेवा करून अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श निर्माण केला आहे. साहित्य क्षेत्रात विविध विषयावर त्यांचे लिखाण आजही समाजाला प्रेरणा देत असते.
गुणवत्ता ही जाती धर्मावर आधारित नसते. माणसाचे कर्तृत्व हे आदर्श असावे लागते असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना ते म्हणाले, सामाजिक कायार्चा वसा आणि वारसा बीड जिल्ह्यात नेहमीच दिसत आला आहे. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. वंचित आणि उपेक्षित समाजासाठी आपण अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. अनेकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश मिळत आहे.
विकासाचा दृष्टीकोन सर्वधर्म सम भावाची भूमिका ठेवतो. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे यासाठीच आपला प्रयत्न असतो. यापुढेही समाजाच्या सेवेसाठी जेथे पुढाकार घेऊन काम करायचे आहे तेथे नक्कीच करू असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
यावेळी सुमंत गायकवाड, सखाराम मस्के, बाबासाहेब थोरात, शिवाजीराव तांदळे, वैभव जोगदंड, सचिन अवचर, नितीन मुजमुले, अ‍ॅड.साळवे, प्रतिक अडागळे, लहू जाधव, सीमा ओस्तवाल उपस्थित होते.
यांचा झाला सन्मान
सत्यशोधक प्रतिष्ठाणच्या वतीने पुरस्कार वितरण व कर्मवीर एकनाथराव आव्हाड हेल्पलाईन नंबरचे लोकार्पण करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या आशा वरपे, मुसाखान, स्वाती अहिरे, सुनीता सोनवणे, संध्या धुरंधरे, साधना कुडके, संगीता जोगदंड, मुक्ता कदम, सुषमा सावळे, डॉ.परमेश्वर डोंगरे, डॉ.संकेत बाहेती, डॉ.किरण शिंदे, मनीषा उजगरे, उत्तम हजारे, मनीषा साळुंके, डॉ. संगीता पिंगळे, डॉ.संजय राऊत यांना रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.

Web Title: Democratic Anna Bhau stockpile guide for all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.