ग्रामीण भागात ट्रॅक्टरची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:32 IST2021-05-01T04:32:22+5:302021-05-01T04:32:22+5:30

अंबाजोगाई : ब्रेक द चैन या काळात सर्व बाजार पेठ बंद आहेत. अशा स्थितीत घरी बसून कंटाळा येतो ...

Demand for tractors increased in rural areas | ग्रामीण भागात ट्रॅक्टरची मागणी वाढली

ग्रामीण भागात ट्रॅक्टरची मागणी वाढली

अंबाजोगाई : ब्रेक द चैन या काळात सर्व बाजार पेठ बंद आहेत. अशा स्थितीत घरी बसून कंटाळा येतो म्हणून शेतकरी उन्हाळी शेतीची मशागतीची कामे उरकून घेत आहेत. बैलाने शेती करण्यापेक्षा ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची मशागत चांगली होते. नांगरट करणे, बांध नीट करणे, वखरणी करणे, अशी कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच सुरू आहेत. या लॉकडाऊनच्या स्थितीतही ट्रॅक्टर चालकांना सुगीचे दिवस प्राप्त झाले आहेत.

नियमबाह्य वाहतुकीमुळे अपघाताचा धोका

अंबाजोगाई : नियमबाह्य व विनापरवाना वाहतुकीचे प्रमाण अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लॉकडाऊनसारखी स्थिती असतानाही वाहने रस्त्यावर सुसाट धावत आहेत. युवक मोठ्या प्रमाणात सुसाट वाहने चालवत आहेत. परिणामी लहान मोठे अपघात सातत्याने घडू लागले आहेत. अशा स्थितीत युवकांवर वाहन चालवितांना पोलिसांनी निर्बंध घालावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद कुलकर्णी यांनी केली आहे.

कलावंतांच्या समस्या सोडविण्याची मागणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्याचे कलावंतांचे मानधन गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. प्रलंबित मानधनासह वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन समिती गठीत करण्याच्या मागणीसाठी संघटनेचा सातत्याने पुढाकार आहे. शासनाने कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये मानधन सुरू करावे, अशी मागणी कलावंत संघटनेने केली आहे. या मागणीकडे सातत्याने पाठपुराव करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कलावंतांची उपेक्षा सुरू आहे.कलावंतांना मानधन द्यावे.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उल्हास पांडे यांनी केली आहे.

लक्षणे असल्यास चाचणी करावी

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्दी, ताप व खोखला, घसा खवखवणे, मळमळणे, चकरा येणे, आदि लक्षणे असणाºया तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाºया संदिग्ध रुग्णांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, अंबाजोगाई शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या परिसरात कोरोना चाचणीसाठी स्वतंत्र केंद्र अस्तित्वात आहे. याठिकाणी चाचण्या करून घ्याव्यात असे आवाहन तहसीलदार विपिन पाटील यांनी केले आहे.

उन्हाळी वर्गाच्या माध्यमातून शिक्षण

अंबाजोगाई : कोरोनाच्या संकटामुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे शाळेच्या वतीने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना दहावी उन्हाळी वर्गाला ऑनलाईन पद्धतीने प्रारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाला अनेक शाळांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आॅनलाईन उपस्थितांचे प्रमाणही समाधानकारक आहे. नियमित शाळा होईपर्यंत ऑनलाईन अभ्यासावर भर दिला जाणार असल्याचे शाळांच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Demand for tractors increased in rural areas