रस्ता रुंदीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:38+5:302021-07-18T04:24:38+5:30
कडा येथील पुलाच्या दुरुस्तीची गरज आष्टी : आष्टी तालुक्यातील कडा येथे नगर-बीड रोडवर असलेल्या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. ...

रस्ता रुंदीकरणाची मागणी
कडा येथील पुलाच्या दुरुस्तीची गरज
आष्टी : आष्टी तालुक्यातील कडा येथे नगर-बीड रोडवर असलेल्या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. हा पूल आता कालबाह्य झाला आहे. पुलाचे कठडे तुटले आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
विद्युत पंपांची चोरी वाढली
बीड : जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंप चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. विद्युत पंपाच्या किमती वाढल्या आहेत. त्यात पंप चोरीला गेला तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
बसस्थानक परिसरात दुर्गंधी
वडवणी : शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरात वाहतूक नियंत्रक कक्ष चालतो. याठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृह नसल्याने स्वच्छता अभावी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. बसस्थानक परिसर स्वच्छ करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत
बीड : शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक नगर रोडवर अनेक शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच मंगल कार्यालये आहेत. येथे असलेल्या गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे नसून सूचना फलक ही लावलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत आणि सूचना फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.