रस्ता रुंदीकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST2021-07-14T04:38:16+5:302021-07-14T04:38:16+5:30

आष्टी : मांदळी-धानोरा-सावरगाव रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या रस्त्यावरून श्रीक्षेत्र मांदळी, सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ, ...

Demand for road widening | रस्ता रुंदीकरणाची मागणी

रस्ता रुंदीकरणाची मागणी

आष्टी : मांदळी-धानोरा-सावरगाव रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या रस्त्यावरून श्रीक्षेत्र मांदळी, सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ, मढी, पैठण येथे भाविक मोठ्या प्रमाणात जातात. यामुळे गेल्या काही वर्षांत या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. तरी या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

शाळा परिसरात गवत वाढले

बीड : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे शाळेचे वर्ग अनेक दिवस उघडले नाही. तसेच शाळेच्या आवारात स्वच्छता केलेली नाही. तरी शाळा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी पालकांतून होत आहे.

पाऊस पडत असल्याने पिकांना जीवदान

बीड : पाटोदा तालुक्यातील सौताडा, धनगर जवळका परिसरात गेल्या चार दिवसांत काही ठिकाणी भीज पाऊस झाला, तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाने १५ दिवस दडी मारली होती. दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसांत काही ठिकाणी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Demand for road widening