टेंडरचालकाकडे केली पैशाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:25 IST2021-06-06T04:25:44+5:302021-06-06T04:25:44+5:30

बीड : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील वाळू घाटाचा लिलाव खरेदी करणाऱ्या कंत्राटदारास धमकावत, पैशाची मागणी करत मारहाण केली ...

Demand for money from the tender operator | टेंडरचालकाकडे केली पैशाची मागणी

टेंडरचालकाकडे केली पैशाची मागणी

बीड : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील वाळू घाटाचा लिलाव खरेदी करणाऱ्या कंत्राटदारास धमकावत, पैशाची मागणी करत मारहाण केली व रोख ७० हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी सहाजणांवर चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘आम्ही राक्षसभुवनकर आहोत, याठिकाणी टेंडर चालू देत नाही आणि चालवायचे असले तर २ लाख रुपये दे’ अशी धमकी देत वाळू घाटाचे टेंडर घेतलेल्या सय्यद जब्बीउल्ला सय्यदअली यांना मारहाण करण्यात आली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात श्रीराम बालाजी नाटकर, सुशांत शिंदे, नारायण दिलीप नाटकर, डिगांबर नाटकर, सुरेश नाटकर, शेख जमीर, बाळासाहेब नाटकर (सर्व रा. राक्षसभुवन) या सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे हे करत आहेत.

Web Title: Demand for money from the tender operator