शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

दोनशे फूट उंचीच्या टॉवरवर चढून मराठा आरक्षणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:37 AM

अंबाजोगाई (जि. बीड ) : तालुक्यातील धानोरा (बु) येथील श्रीकांत पंडित सोमवंशी (४५) हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी सायंकाळी दोनशे फूट उंचीच्या विद्युत पॉवर ग्रीड टॉवरवर चढल्याने खळबळ उडाली.उपस्थित शेकडो ग्रामस्थ सूर्यवंशींना खाली या, खाली या असे आवाहन करत होते. जोपर्यंत माझा प्रशासनाशी संपर्क होणार नाही, तोपर्यंत मी खाली उतरणार ...

अंबाजोगाई (जि. बीड) : तालुक्यातील धानोरा (बु) येथील श्रीकांत पंडित सोमवंशी (४५) हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी सायंकाळी दोनशे फूट उंचीच्या विद्युत पॉवर ग्रीड टॉवरवर चढल्याने खळबळ उडाली.

उपस्थित शेकडो ग्रामस्थ सूर्यवंशींना खाली या, खाली या असे आवाहन करत होते. जोपर्यंत माझा प्रशासनाशी संपर्क होणार नाही, तोपर्यंत मी खाली उतरणार नाही, असा हट्ट सूर्यवंशी हे धरून बसल्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. महावितरणने परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. घटनेची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसिलदार संतोष रूईकर, पोलीस कर्मचारी, अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

स्वामी यांनी सूर्यवंशी यांना विश्वासात घेत आपण टॉवरवरून खाली येऊन म्हणने मांडावे असे सूचित केले. तासाभराने सोमवंशी खाली उतरले. त्यामुळे शेकडो उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सोमवंशी यांना खाली उतरल्यानंतर लगेचच स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी त्यांचे म्हणने ऐकून घेणार आहेत.

टॅग्स :BeedबीडMaratha Reservationमराठा आरक्षणMarathwadaमराठवाडा