शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

बीडच्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांची मागणी; आम्हाला आणखी कर्ज पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:26 AM

मागील पाच वर्षांत १०२५ शेतक-नी मृत्यूस कवटाळले. त्या सर्व पात्र-अपात्र शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये त्यांना कुठल्या योजनांची अन् सुविधांची गरज आहे, याची माहिती घेतली असता घरकुलाच्या योजनेसह आणखी कर्ज द्या, अशी मागणी या कुुटुंबियांकडून केली जात असल्याचे ‘मिशन दिलासा’ सर्वेक्षणातून समोर आले आहे. गत दोन महिन्यांपूर्वी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्कबीड :मागील पाच वर्षांत १०२५ शेतक-यांनी मृत्यूस कवटाळले. त्या सर्व पात्र-अपात्र शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये त्यांना कुठल्या योजनांची अन् सुविधांची गरज आहे, याची माहिती घेतली असता घरकुलाच्या योजनेसह आणखी कर्ज द्या, अशी मागणी या कुुटुंबियांकडून केली जात असल्याचे ‘मिशन दिलासा’ सर्वेक्षणातून समोर आले आहे. गत दोन महिन्यांपूर्वी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

दोन महिन्यांपूर्वी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांची माहिती घेण्यासंदर्भात जिल्हाधिका-यांना आदेशित केले होते. त्याप्रमाणे प्रत्येक शेतक-याच्या कुटुंबासाठी एक अधिकारी नेमला. यामध्ये प्रामुख्याने कृषी, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महसूलच्या अधिकाºयाचा समावेश होता. १५ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी हे सर्वेक्षण करण्यात आले. हा अहवाल ७ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला होता.

सर्वेक्षणात या गोष्टींची घेतली माहितीआत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील सदस्य संख्या, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला का, मिळाला तर कोणत्या योजनांचा? त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देता येतो का? मुलांचे शिक्षक, त्यांचे उत्पन्न आदींची माहिती संकलित केली होती. तसेच कर्जाच्या सद्य:स्थितीचा आढावाही घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांची मागणी काय आहे, सध्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे, मूलभूत सुविधांचा लाभ मिळतो का, याचीही माहिती घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले होते. त्याप्रमाणे माहिती घेण्यात आली.

५ वर्षांत १०२५ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूलामागील पाच वर्षांत गेवराई तालुक्यात सर्वाधिक २१९ शेतकºयांनी जीवन संपविले. त्यानंतर बीड २१६, केज ११८, अंबाजोगाई १०६, पाटोदा ६९, परळी ६०, शिरूर ५९, धारूर ५८, वडवणी ४४, माजलगाव ४०, आष्टी ३६ अशा एकूण १०२५ शेतकºयांनी मृत्यूस कवटाळले.

जिल्हाधिका-यांनी घेतली बैठकसर्वेक्षणानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या प्रमुखांची बैठक घेऊन या योजनेचा लाभ देण्यासंदर्भात आदेश दिले. त्याप्रमाणे कामकाज सुरूही झाले. आता दुसºया टप्प्यात किती शेतकºयांना योजनांचा लाभ दिला याबाबत लवकरच बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.योजनांचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना तात्काळ लाभ द्यावा, अशी मागणीही जोर धरु लागली आहे.३१८ घरी चुलीवरच भाजतेय भाकरीपूर्वी शहरात आणि आता ग्रामीण भागातही आता घरोघरी गॅस जोडणी आहे; परंतु ३१८ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांकडे अद्यापही गॅस जोडणी नाही. ही जोडणी देण्याची मागणी त्यांनी केली. त्यात बीड तालुका आघाडीवर आहे.

वीज जोडणीची मागणीअनेकांच्या शेतात पाणी आहे, परंतु हक्काची वीज नाही. २९८ शेतकरी कुटुंबियांनी शेतात वीज जोडणी करुन देण्याची मागणी केली आहे. यात बीड तालुक्यातील सर्वाधिक ११७ शेतकºयांच्या कुटुंबियांचा समावेश असल्याचे समजते.

२१५ घरांमध्ये अंधारअद्यापही २१५ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या घरात वीज जोडणीअभावी अंधार आहे. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न बिकट झाला आहे. हाच धागा पकडून बीड तालुक्यातील ११० कुटुंबियांसह जिल्ह्यात २१५ जणांनी घरी वीज जोडणी देण्याची मागणी केली आहे. बीडनंतर गेवराई, पाटोदा, शिरुर कासार व वडवणी तालुक्याचा क्रमांक लागतो.

६५२ जणांना घरकुलाची गरजअनेकांची घरे आजही पत्र्याची अन् कुडाची आहेत. दुष्काळ व नापिकीमुळे हाती पैसा आला नाही, रोजचे पोट भरणे मुश्किल झाले. अशात घर बांधायचे कसे, असा प्रश्न या कुटुंबियांना पडला आहे. कर्ती व्यक्ती गेल्यानंतर घर बांधायचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यामुळे आम्हाला घरकुल द्या, अशी मागणी ६५२ शेतकरी कुटुंबियांनी केली. बीड १८१, गेवराई १७७, शिरूर १०, आष्टी २८, पाटोदा, माजलगाव ३८, धारूर ५४, वडवणी २५, केज ७, अंबाजोगाई २४, परळी ४४ अशी संख्या आहे.

४६० जणांना हवे आणखी कर्जअगोदरच कर्जाचा डोंगर डोक्यावर असल्याने घरातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केली. हे कर्ज माफ करून पुन्हा कुटुंबाला सक्षम करण्यासाठी शासनाने आणखी कर्ज द्यावे, अशी मागणी ४६० शेतकºयांनी केली आहे. यामध्ये गेवराई १५५, बीड ६८, शिरूर २०, आष्टी २५, पाटोदा ५४, माजलगाव १, धारूर ५४, वडवणी ३०, अंबाजोगाई ५२ व परळी १ यांचा समावेश आहे.

आमच्या आरोग्याचीही घ्या काळजीबिकट आर्थिक परिस्थितीमुळे या शेतकºयांना खाजगी दवाखान्यात जाता येत नाही. सरकारी दवाखान्यात दर्जेदार उपचार मिळत नाहीत. त्यामुळे आमच्या आरोग्यविषयक उपचाराची काळजी घ्या, अशी मागणी १८० शेतकरी कुटुंबियांनी केली आहे. बीड, गेवराई तालुका यामध्ये आघाडीवर आहे.

शौचालय बांधून द्यावे...बिकट आर्थिक परिस्थितीमुळे या शेतकºयांना खाजगी दवाखान्यात जाता येत नाही. सरकारी दवाखान्यात दर्जेदार उपचार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे आमच्या आरोग्यविषयक उपचाराची काळजी घ्या, अशी मागणी १८० शेतकरी कुटुंबियांनी केली आहे.

५१२ जणांना केली विहिरीची मागणीअनेकांकडे शेती आहे, पण पाणी नाही. कोरडवाहू शेतीत अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळत नाही. पेरणीसाठी लागलेला खर्च पदरी पडत नाही. शेती जलयुक्त करण्यासाठी ५१२ कुटुंबियांनी विहिरींची मागणी केली आहे. यात बीड १७७, गेवराई ११८ हे तालुके आघाडीवर आहेत, तर १२९ कुटुंबियांनी शेततळ्यांची मागणी केली.

अन्न सुरक्षा योजनेचा लाभही नाही१०२५ पैकी ३८१ कुटुंबियांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेचा लाभ देण्याची मागणी बीड तालुक्यातील १४२, केज ११८ सह ३८१ कुटुंबियांनी केली.

सक्षमतेसाठी वेतन द्यासंजय गांधी योजनेअंतर्गत वेतन दिले तर आम्ही सक्षम होऊ, असा खुलासा ४५४ कुटुंबियांनी केला आहे. इतर योजनांचाही लाभ द्यावा, असे १८० कुटुंबियांची मागणी आहे.

वसतिगृहाची मागणी४परिस्थितीमुळे शहराच्या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी जाता येत नाही. राहण्याची सोय नसल्याने अनंत अडचणी येतात. आमच्या मुलांना वसतिगृहाची सुविधा द्या, अशी मागणी २३४ कुटुंबियांनी केली. यात बीड व गेवराई आघाडीवर आहे.